तीन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला; शहरात हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 01:29 PM2023-10-18T13:29:41+5:302023-10-18T13:31:18+5:30

मेहुण्यासोबत गेला होता शेतात

The body of a young man who had been missing for three days was found in Gosikhurd's Gadisurla canal | तीन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला; शहरात हळहळ

तीन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला; शहरात हळहळ

सावली : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शहरातील एका युवकाचा गोसेखुर्दच्या गडीसुर्ला नहरात सोमवारी (दि. १६) सायंकाळी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. प्रज्वल रोशन डोहणे २१ रा.सावली असे मृताचे नाव आहे.

प्रज्वल डोहणे हा युवक शनिवारी (दि. १४) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घराशेजारी मेहुण्यासोबत शेतातील पिकांवर युरिया टाकण्यासाठी गेला होता. मेहुण्याने शेताशेजारील गोसेखुर्दच्या कालव्याजवळ प्रज्वलला थांबायला सांगितले व तो खत टाकण्यासाठी मदत व्हावी, म्हणून दोन मजुरांना बोलावण्यासाठी चकपिरंजी येथे गेला. काही वेळात परत आल्यानंतर नहराजवळ प्रज्वल दिसला नाही. घरी गेला असेल, या विचाराने शेतात खत टाकण्याचे काम करून, तो प्रज्वलच्या घरी गेला, पण प्रज्वल घरी आला नव्हता. सर्व प्रकार त्याने कुटुंंबाला सांगितला. त्यानंतर, सर्वांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, कुठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंंबाने पोलिसात तक्रार केली.

असा लागला शोध

सावली पोलिसांनी मृत प्रज्वलचे मोबाइल लोकेशन ट्रॅक केले असता, गोसेखुर्द नहराची नोंद झाली. त्यावरून पोलिसांच्या बचाव पथकाने नहरात शोध घेताना सोमवारी मृतदेह आढळला. प्रज्वलचे हात खताच्या पिशवीने भरले होते. त्यामुळे तो नहराच्या पाण्यात हात घुताना घसरून पडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

सावलीत हळहळ

प्रज्वलचे वडील मोलमजुरी करतात. प्रज्वलने नवोदय विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नुकत्याच झालेल्या वनविभागाच्या परीक्षेत त्याने चांगला स्क्रोअर मिळविला होता. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या प्रज्वलचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: The body of a young man who had been missing for three days was found in Gosikhurd's Gadisurla canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.