दारू बाळगण्याच्या परवान्यावर दारू विक्रीचा व्यवसाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:22 IST2025-03-06T15:21:15+5:302025-03-06T15:22:52+5:30

पोलिसांनाही गुंगारा : दारू विक्रेत्यांची नवी शक्कल; चौकशी व्हावी

The business of selling alcohol on the license to possess alcohol! | दारू बाळगण्याच्या परवान्यावर दारू विक्रीचा व्यवसाय !

The business of selling alcohol on the license to possess alcohol!

शशिकांत गणवीर 
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव :
दारूच्या व्यसनाधीनतेने अनेक कुटुंबे उघड्यावर येत असून दारूमुळे अनेक समाजविघातक कृत्ये घडत असल्याने काही गावांत महिलांनी कंबर कसत गाव दारूमुक्त ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, दारूबंदीच्या गावातही दारू विक्रेत्यांनी नवी शक्कल लढवत दारू बाळगण्याची ऑनलाइन परवानगी काढून दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू ठेवल्याचे वास्तव आहे. त्यामुळे विक्रेत्याजवळ एखाद्या वेळी दारू मिळाली तरी स्वतःला पिण्यासाठी आणली म्हणत कारवाईपासून पळ काढत आहेत. त्यामुळे या नव्या प्रकाराची चौकशी करून दारू विक्रेत्याच्या मुसक्या प्रशासनाने आवळाव्यात अशी मागणी महिला करीत आहेत. मूल पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दिघोरी गावात हा प्रकार सुरू असून दारू बाळगण्याच्या परवान्याआड सर्रास दारू विक्री होत असल्याने महिला हतबल ठरत आहेत. चौकशी करून कारवाई करावी अशी महिलांची मागणी आहे.


पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी
दारू बाळगण्याचा परवाना काढून गावात दारू विक्री केली जात असतानाही याबाबत पोलिस अनभिज्ञ कसे, असा प्रश्न आहे. पोलिस विभागाने आतातरी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 


सोशल मीडियावर जाहिरात
मद्यपान करणे आणि बाळगण्यासाठी ऑनलाइन परवाना काढून मिळेल. या आशयाखाली शासकीय आदेशानुसार दारू पिण्याचा परवाना आवश्यक आहे. दारू पिणे, खरेदी करणे, बाळगणे, वाहतूक करणे याकरिता एक दिवस किंवा कायमचे लायसन्स काढून मिळेल, अशी जाहिरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


"दिघोरी येथे महिलांच्या व तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने गाव दारूमुक्त आहे. मात्र, दारू बाळगण्याचा परवाना काढून गावात दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी."
- अमोल वाकुडकर, पोलिस पाटील दिघोरी.

Web Title: The business of selling alcohol on the license to possess alcohol!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.