झेडपी लढविण्यासाठी घोडामैदान आणखी दूरच; खर्च करतानाही होतेय दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 12:41 PM2023-01-25T12:41:16+5:302023-01-25T12:43:53+5:30

इच्छुकांची मेळावे व शिबिरांना हजेरी

The horse field to fight ZP is further away; risk while spending money | झेडपी लढविण्यासाठी घोडामैदान आणखी दूरच; खर्च करतानाही होतेय दमछाक

झेडपी लढविण्यासाठी घोडामैदान आणखी दूरच; खर्च करतानाही होतेय दमछाक

Next

चंद्रपूर : जिल्ह्यात डिसेंबर महिन्यामध्ये ५८ गावांत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी झाली. त्यामुळे आता तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, अशी अपेक्षा इच्छुकांची होती. मात्र सध्या तरी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद निवडणुकीचा काहीच ठावठिकाणा नसल्याने इनेक इच्छुकांनी आपल्या प्रचारतोफा काही दिवसांसाठी थांबविल्या असून खर्चासाठीही आखडता हात घेतला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद, महापालिका, तसेच नगरपरिषदेवरही सध्या प्रशासनराज सुरू आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह नगरपालिकातील इच्छुकांनी वर्षभरापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु सातत्याने निवडणूक लांबत आहे. इच्छुक मंडळींची कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवताना मोठी दमछाक होत असून बजेटही वाढत आहे. त्यामुळे काही इच्छुकांनी निवडणुकीचे स्वप्न बघणेही सोडून दिले आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात ताकदीने उतरावे लागणार असल्याने निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतरही तयारीला लागण्याचा विचार सुरू केला आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका तसेच काही नगरपालिकांमध्ये प्रशासकराज आहे. आज नाही तर उद्या निवडणुका होतील, यासाठी इच्छुक पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली. मात्र निवडणुकीचा काहीच ठावठिकाणा नाही. त्यामुळे इच्छा असूनही काहींनी आपला जनसंपर्क थांबविल्याची स्थिती जिल्ह्यात बघायला मिळत आहे. आता निवडणुकांचे पडघम कधी वाजतात, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

वर्चस्वासाठी सर्वकाही

निवडणुकीला अजून बराच अवधी असला तरी आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी काहींनी विविध मेळावे, वाढदिवस, लग्नकार्याला हजेरी लावले सुरूच ठेवले आहे. निवडणुका लांबणीवर जात असल्याने खर्चाचे बजेटही वाढत आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काहींना ताकद खर्च करून सरपंच, सदस्य निवडून आणले. आपापल्या गट आणि गणात येणाऱ्या गावांमध्ये नेतेमंडळींनी संपर्क वाढवला होता. कार्यकर्त्यांनाही चार्ज केले होते.

विविध कारणांनी निवडणुका लांबणीवर

वर्षभरापासून विविध कारणांनी निवडणुका प्रलंबित आहेत. मात्र झेडपी, महापालिका, नगरपरिषदेसाठी सज्ज झालेल्यांचे मोठा हिरमोड होत आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी तसेच कार्यकर्ते दुरावू नयेत यासाठी मेळावे, शिबिरेही घेतल्या जात आहेत.

५८ ग्रामपंचायतींची निवडणूक

जिल्ह्यात डिसेंबर महिन्यामध्ये ५८ ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. यावर्षी सरपंचाची थेट निवडणूक असल्याने मोठी चुरस बघायला मिळाली. विविध राजकीय पक्षांनीही या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले होते.

Web Title: The horse field to fight ZP is further away; risk while spending money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.