४० वर्षांपासून प्रलंबित जमिनीचा प्रश्न सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2022 05:00 AM2022-02-20T05:00:00+5:302022-02-20T05:00:39+5:30
ब्रह्मपुरीत प्रशासन स्थिरावण्यासाठी १९ कोटी खर्चून करून अधिकारी - कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन केले. उद्यान व जलतरण तलावासाठी ९ कोटी, क्रीडा संकुलासाठी ८ कोटी दिले. पं. स. इमारतीसाठी १४ कोटी मंजूर आहे. १०० बेड्सचे रुग्णालय होत असून पुन्हा १२ कोटी आयसीयू बेडसाठी मिळाल्याची माहिती ना. वडेट्टीवार यांनी दिली. कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत नानाजी सावरकर, शोभा सोनटक्के, जीजा पारधी, विद्या ठाकरे व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील माया पारधी यांना धनादेश देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरीतील ४० वर्षांपासून शारदा कॉलनीचा प्रलंबित असलेल्या कायमस्वरूपी पट्ट्याचा प्रश्न पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे कायमचा सुटला आहे. पात्र ४२ कुटुंबांना शनिवारी पट्ट्यांचे प्रमाणपत्र वाटप केले. इतर ठिकाणी अतिक्रमणधारकांनाही पट्टे वाटप करू, अशी ग्वाही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी महाराजस्व अभियानात दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, एसडीपीओ मिलिंद शिंदे, कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, तहसीलदार उषा चौधरी, प्रभाकर सेलोकर, खेमराज तिडके, विलास विखार, प्रा. जगनाडे उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, समाजातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांना न्याय देण्याची महाराजांची भूमिका होती. याच संकल्पनेवर राज्य शासन काम करत आहे. ब्रह्मपुरीत प्रशासन स्थिरावण्यासाठी १९ कोटी खर्चून करून अधिकारी - कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन केले. उद्यान व जलतरण तलावासाठी ९ कोटी, क्रीडा संकुलासाठी ८ कोटी दिले. पं. स. इमारतीसाठी १४ कोटी मंजूर आहे. १०० बेड्सचे रुग्णालय होत असून पुन्हा १२ कोटी आयसीयू बेडसाठी मिळाल्याची माहिती ना. वडेट्टीवार यांनी दिली. कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत नानाजी सावरकर, शोभा सोनटक्के, जीजा पारधी, विद्या ठाकरे व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील माया पारधी यांना धनादेश देण्यात आला. सर्वांसाठी घरे अंतर्गत रवींद्र देशमुख, युवराज बगमारे, पुष्पा गेडाम, मनोहर मेश्राम यांना, न. प. क्षेत्रातील जीजा चाफले, सुषमा भेदरे, मंदा बोरकर यांना प्रमाणपत्र तर प्राधान्यकुटुंब योजनेंतर्गत जया करबे, वैशाली प्रधान, तेजस्विनी दलाल यांना शिधापत्रिका वाटप केले. प्रास्ताविक तहसीलदार उषा चौधरी व संचालन नरेश बोधे यांनी केले. राऊत यांनी आभार मानले.
तीन हजार महिलांना रोजगार
- ब्रह्मपुरीत छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी दीड कोटी खर्च करू. पाणी पुरवठा योजना व १०० कोटींची भूमिगत गटार योजना प्रस्तावित आहे. गारमेंट क्लस्टरद्वारे तीन हजार महिलांना येथे रोजगार उपलब्ध होत आहे, असेही ना. वडेट्टीवार यांनी सांगितले.