अडीच वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 12:56 PM2022-05-13T12:56:23+5:302022-05-13T14:00:56+5:30

दुर्गापूर वेकोली परिसरात बिबट्याला बेशुद्ध करून केले जेरबंद

The leopard that attacked the two-and-a-half-year-old girl caught in durgapur | अडीच वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद

अडीच वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद

googlenewsNext

चंद्रपूरदुर्गापूर वेकोली परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास या बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात कैद करण्यात आले व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मागील काही महिन्यांपासून दुर्गापूर-उर्जानगर परिसरात बिबट व वाघाने थैमान घातले आहे. या परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. घराच्या अंगणात बिबट्याचे हल्ले वाढले होते. यापूर्वी या भागात एक बिबट व वाघ जेरबंद झाला होता. या नंतरही बिबट्याचे हल्ले सुरूच असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

यावर्षी बिबट्याच्या हल्ल्यात चार जणांचा बळी गेलाय. गेल्या आठवड्यात अडीच वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला होता. मात्र, तिच्या आईने जीवाची बाजी लावत चिमुकलीला वाचवले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वनविभागाला घेरले होते. 

यानंतर,  हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम सुरू होती. त्याला जेरबंद करण्याकरिता काही ठिकाणी पिंजरे लावण्यात आले. यासह ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली. याशिवाय वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. अखेर आज या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. 

Web Title: The leopard that attacked the two-and-a-half-year-old girl caught in durgapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.