दिवाळीच्या साहित्याने बाजारपेठ सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 11:31 PM2022-10-19T23:31:05+5:302022-10-19T23:32:17+5:30

वर्षभरात साजरे केले जाणाऱ्या विविध सणांपैकी दीपावली या सणाबाबत आबालवृद्धांपासून साऱ्यांना विशेष आकर्षण असते. पाच दिवसांच्या या सणामध्ये प्रत्येक दिवसाचे एक वेगळे दिनविशेष असल्याने प्रत्येक दिवसासाठी लागणाऱ्या विविध स्वरूपातील वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठेत हळूहळू गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची आपल्या दुकानाला पहिली

The market was decorated with Diwali materials | दिवाळीच्या साहित्याने बाजारपेठ सजली

दिवाळीच्या साहित्याने बाजारपेठ सजली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वर्षभरातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी वाढू लागली आहे. खरेदीसाठी लोकांमध्ये लखलख चंदेरी उत्साह दिसून येत आहे. नोकरदारवर्गाची दिवाळी खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र, परतीच्या पावसाचा तडाखा बसल्याने यंदा शेतकरीवर्ग ऐन दीपावलीच्या तोंडावर हवालदिल झाला असल्याचे चित्र आहे.
वर्षभरात साजरे केले जाणाऱ्या विविध सणांपैकी दीपावली या सणाबाबत आबालवृद्धांपासून साऱ्यांना विशेष आकर्षण असते. पाच दिवसांच्या या सणामध्ये प्रत्येक दिवसाचे एक वेगळे दिनविशेष असल्याने प्रत्येक दिवसासाठी लागणाऱ्या विविध स्वरूपातील वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठेत हळूहळू गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची आपल्या दुकानाला पहिली
पसंती मिळावी यासाठी दुकानदारांनीही आपापली दुकानेविविध प्रकारे सजवून ठेवली आहेत, तर किराणा सामान, फटाक्यांची दुकाने,इलेक्ट्रॉनिक वस्तू, फूलवाल्यांची दुकाने, कपड्याची दुकाने, मिठाईचीदुकाने, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने आदी दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे.

आकाशकंदील वेधत आहे लक्ष
- अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणासाठी बाजारपेठ बहरली आहे. प्रकाशाचा झगमगाट करणारे आकाशकंदील, दिवे, पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. विविध डिझाइन, रंगसंगती, आकारांतील आकाशकंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, कागदांच्या वाढत्या किमतीमुळे यंदा आकाशकंदील जवळपास २० टक्क्यांनी महागले आहेत. 
- दीपोत्सवासाठी रंगीबेरंगी कागदी. कापडी आणि प्लास्टिकचे आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. दोन वर्षांनंतर यंदा आकाशकंदिलाच्या बाजाराला बहर आला आहे

चांदणी कंदील खातोय भाव
१ पारंपरिक आणि काही नव्या प्रकारातील आकर्षक आकाशकंदिलांनी बाजारपेठा सजल्या आहेत. चांदणी, पेशवाई, टोमॅटो बॉल, पॅराशूट यांच्यासह इको फ्रेंडली हॅण्डमेड आकाशकंदील यंदा बाजारात आहेत.

२ दिवाळीनिमित्त घर सुशोभित करण्यासाठी विविध आकर्षक स्टीकर बाजारात आले आहेत. यात शुभ-लाभ, स्वस्तिक, पावले. श्री, ॐ आणि इतर सजावट साहित्याचा समावेश आहे.

३ कागदी, प्लास्टिक, पीव्हीसी, मेटॅलिक, अक्रेलिक, अशा अनेक प्रकारांत दाखल आहेत. मोती तसेच फुलांचे तोरण, टिकाऊ फुलाची माळ, आकर्षक मेणाचे विविध प्रकारचे दिवे, लायटिंग पणत्यांनी दुकाने सजली आहेत.

आतषबाजीला ग्रहण
दिवाळीच्या आतषबाजीला महागाईचे ग्रहण लागले आहे. यंदा फटाक्यांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या किमतीतही कमालीची वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे लहान मुलांसह फटाके फोडणाऱ्यांनादेखील चिंता सतावत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची मागणी वाढणार

चंद्रपूर औद्योगिक वसाहतीमधील लघू व मध्यम कारखाने सुरू झाले.  बऱ्यापैकी रोजगार मिळू लागला. कोरोना काळात डबघाईस आलेली इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची बाजारपेठ यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सवापासून पूर्वपदावर आली. गणेश मंडळांनी सजावटीसाठी नवनवीन वस्तुंची डिमांड केल्याने उलाढाल वाढली. दिवाळीपर्यंत हे चित्र कायम राहू शकते.

 

Web Title: The market was decorated with Diwali materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.