पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही - सीईओ विवेक जॉन्सन

By राजेश मडावी | Published: October 21, 2023 02:09 PM2023-10-21T14:09:31+5:302023-10-21T14:24:17+5:30

स्मृती दिनानिमित्त शहीद पोलिसांना श्रद्धांजली

The nation will never forget the sacrifices of the police - CEO Vivek Johnson | पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही - सीईओ विवेक जॉन्सन

पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही - सीईओ विवेक जॉन्सन

चंद्रपूर : नागरिकांचे तसेच देशाचे रक्षण करताना वीरगती मिळालेल्या शहीद पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी पोलिस स्मृतिदिनानिमित्त पोलिस मुख्यालयातील कार्यक्रमात शनिवारी (दि. २१) ते बोलत होते.

यावेळी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार, रवींद्र जाधव, पोलिस निरीक्षक विजय राठोड, राजेश मुळे, वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन्सन म्हणाले, लडाखच्या बर्फाच्छादित प्रदेशात २१ ऑक्टोबर १९५९ रोजी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान सीमेवर गस्त घालत असताना चिनी सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात १० पोलिस शहीद झाले. तेव्हापासून राज्य व देशात वर्षभरात शहीद झालेल्या पोलिसांना २१ ऑक्टोबर रोजी अभिवादन केले जाते, अशी माहितीही त्यांनी दिली. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलिस मुख्यालयातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलिसांनी बंदुकीच्या गोळ्या हवेत झाडत शहिदांना मानवंदना दिली. कार्यक्रमाला उपस्थित शहीद कुटुंबीयांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक परदेशी यांनी संवाद साधला.

Web Title: The nation will never forget the sacrifices of the police - CEO Vivek Johnson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.