नवी बुलेट बिघडल्याने थांबले अन् टिप्परने उडवले; मायलेकाचा जागीच मृत्यू, वडील जखमी

By परिमल डोहणे | Published: May 21, 2023 08:28 PM2023-05-21T20:28:46+5:302023-05-21T20:28:58+5:30

नागभीड-तळोधी मार्गावरील बोकडडोह पुलावरील घटना.

The new bullet was stopped as it collided by truck; mother and son died on the spot, father injured | नवी बुलेट बिघडल्याने थांबले अन् टिप्परने उडवले; मायलेकाचा जागीच मृत्यू, वडील जखमी

नवी बुलेट बिघडल्याने थांबले अन् टिप्परने उडवले; मायलेकाचा जागीच मृत्यू, वडील जखमी

googlenewsNext

चंद्रपूर : नवी बुलेट खरेदी करून वडील व मोठा मुलगा चारचाकीने अन् आई व लहान मुलगा बुलेटने नागपूरवरून निघाले. बोकडडोह पुलावर अचानक बुलेट बंद पडली. त्यामुळे बुलेट व चारचाकीही पुलावर उभी करून ते बुलेटला काय झाले बघत असतानाच भरधाव येणाऱ्या टिप्परने दुचाकी व चारचाकी वाहनाला जबर धडक दिली. यात मायलेक पुलाखाली फेकल्या गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान घडली. कल्पना रमाकांत कड्यालवार (५५), साहिल रमाकांत कड्यालवार, रा. सिंदेवाही अशी मृत मायलेकांची नावे आहेत.

सिंदेवाही येथील रमाकांत कड्यालवार हे मुले आणि पत्नीसह नागपूरला गेले होते. मुलास दुचाकी विकत घ्यायची होती तर त्यांना दवाखान्याचे काम होते. कामे आटोपून नागपूरवरून ते रात्री ८ वाजताच्या दरम्यान सिंदेवाहीच्या दिशेने निघाले. यावेळी रमाकांत यांचा लहान मुलगा साहिल याने बुलेटवर आईला घेतले तर मोठा मुलगा समीर हा वडील रमाकांत व एका ओळखीच्या व्यक्तीसह त्यांच्या एम एच ०४ -जी झेड १३७४ या क्रमांकाच्या कारने निघाले. बुलेट पुढे आणि कार मागे असा प्रवास सुरू होता.

नागपूरवरून येत असताना नवीन बुलेट दोनदा बंद पडली. काही वेळाने ती सुरूही होत होती. अशीच पुन्हा नागभीड-तळोधी दरम्यान असलेल्या बोकडडोह पुलावर बंद पडली. या बंद पडलेल्या बुलेटजवळ समीरने कार उभी केली. समीरचा लहान भाऊ साहिल आणि आई बुलेटजवळच उभे होते. एवढ्यात नागभीडकडून येणाऱ्या भरधाव टिप्परने चारचाकी व बुलेटला धडक देऊन पसार झाला. या धडकेने बुलेटजवळ उभे असलेला साहिल आणि आई कल्पना पुलाखाली पडले. यात त्यांचा मृत्यू झाला. तर कारमध्ये बसलेल्या रमाकांत यांच्या पायाला जबर दुखापत झाली.

मोठा मुलगा समीर याने तातडीने पोलिसांना ही माहिती दिल्याने पोलिस आणि रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी आले व रमाकांत यांना नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. दोघांच्याही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. अधिक तपास नागभीड पोलिस करीत आहेत.

Web Title: The new bullet was stopped as it collided by truck; mother and son died on the spot, father injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.