जिल्ह्यात सहाही विधानसभा क्षेत्राच्या लढतीचे चित्र स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 02:29 PM2024-10-28T14:29:25+5:302024-10-28T14:30:58+5:30

काँग्रेस विरुद्ध भाजप असा रंगणार सामना : काँग्रेसची अंतिम यादी जाहीर

The picture of the fight for all the six assembly constituencies in the district is clear | जिल्ह्यात सहाही विधानसभा क्षेत्राच्या लढतीचे चित्र स्पष्ट

The picture of the fight for all the six assembly constituencies in the district is clear

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
महाविकास आघाडीतील काँग्रेसचे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार रविवारी रात्री घोषित झाले. त्यामुळे आता जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना यावेळी विधानसभा क्षेत्रात बघायला मिळणार आहे. रविवारी रात्री घोषित झालेल्या काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये वरोरा विधानसभा क्षेत्रासाठी प्रवीण काकडे, चंद्रपूरसाठी प्रवीण पडवेकर, तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी संतोष रावत यांचे नाव निश्चित झाले आहे.


निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोण उमेदवार राहील याबाबत चर्चांना उधाण आले होते. महायुतीतील भाजपचे सहाही विधानसभा क्षेत्रातील उमेदवार घोषित झाल्यानंतरही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने तीन विधानसभा क्षेत्रातील उमेदवार घोषित केले नव्हते. यामुळे सामान्य नागरिकांसह राजकीय नेत्यांचेही याकडे लक्ष लागले होते. सर्वाधिक चर्चेत असलेल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून संतोष रावत यांचे नाव जाहीर झाले आहे. 


वरोरा विधानसभा क्षेत्रातून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून तब्बल २६ इच्छुकांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. त्यामुळे यातील कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत सर्वत्र चर्चा होती. प्रवीण पडवेकर यांच्या नावाची घोषणा झाल्याने आता पडवेकर विरुद्ध जोरगेवार अशी लढत होणार आहे. 

विधानसभानिहाय लढती 

बानपूर 
किशोर जोरगेवार (भाजप) विरुद्ध प्रवीण पडवेकर (काँग्रेस) 
बल्लारपूर 
सुधीर मुनगंटीवार (भाजप)  विरुद्ध संतोष रावत (काँग्रेस) 
ब्रह्मापुरी 
विजय वडेट्टीवार (काँग्रेस) विरुद्ध कृष्णा सहारे (भाजप)
चिमूर 
कीर्तिकुमार भांगडिया (भाजप) विरुद्ध सतीश वारजुकर (काँग्रेस)
राजुरा 
सुभाष धोटे (काँग्रेस) विरुद्ध देवराव भोंगळे (भाजप)
वरोरा 
प्रवीण काकडे (काँग्रेस) विरुद्ध करण देवतळे (भाजप)

Web Title: The picture of the fight for all the six assembly constituencies in the district is clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.