नात्याला फासला काळीमा! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास अटक

By राजेश मडावी | Published: August 31, 2023 07:41 PM2023-08-31T19:41:28+5:302023-08-31T19:41:32+5:30

माहिती लपविल्याने आई व भावावरही गुन्हा दाखल

The relationship is broken! Bapas arrested for abusing a minor girl | नात्याला फासला काळीमा! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास अटक

नात्याला फासला काळीमा! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास अटक

googlenewsNext

चंद्रपूर : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बल्लारपूर पोलिसांनी अटक केल्याची घटना शहरात मंगळवारी (दि. २८) घडली. अत्याचाराची माहिती लपवून ठेवणारी आई व भावावरही गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बल्लारपूर शहरातील एका वार्डात बापाने स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याबाबत मुलीने आई आणि भावाला माहिती दिली. परंतु दोघांनी याकडे दुर्लक्ष केले. शेवटी मुलीनेच बल्लारपूर पोलिस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला व तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी वडिलाविरूद्ध भादंवि ३७६ व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आई व भावाने माहिती लपवून ठेवल्याने पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला. पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत.

Web Title: The relationship is broken! Bapas arrested for abusing a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.