दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्राच्याच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 10:52 AM2023-01-20T10:52:18+5:302023-01-20T10:54:37+5:30

जालन्यातील एक, औरंगाबादची एक आणि चंद्रपूरची एक कंपनी

The three companies that signed the agreement in Davos Economic Conference are from Maharashtra | दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्राच्याच

दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्राच्याच

Next

अरुणकुमार सहाय

चंद्रपूर : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांंत ज्या तीन कंपन्यांनी उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. त्या तीनही कंपन्या महाराष्ट्रातीलच असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने एका कंपनीच्या संचालकांशी बोलून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला असता या वस्तुस्थितीची पुष्टी झाली.

१. अमेरिकन कंपनी न्यू एज क्लिनटेक सोल्यूशन प्रा. लि.

ही कंपनी इटखेडा, औरंगाबादची आहे. त्याची नोंदणी २ जून २०२२ रोजी झाली. अधिकृत भागभांडवल ३ कोटी आणि पेडअप कॅपिटल १५४ कोटी रुपये आहे. गोपीनाथ लटपटे, बाळासाहेब दराडे आणि निहित अग्रवाल हे संचालक आहेत. कॉर्पोरेट सर्टिफिकेशन म्हणजेच सीईएन क्रमांक यू १४२०० एमएच २०२२ पीटीसी ३८३०९५ आहे. ही कंपनी २० हजार कोटींचा कोळसा गॅमिफिकेशन प्लांट उभारणार आहे.

२. फेरो अलॉय प्रा. लि.

ही कंपनी इंग्लंडची असल्याचे दर्शविले आहे. मात्र, ती जालन्यातील आहे. १७ जुलै २०१७ रोजी या कंपनीची नोंदणी झाली. त्याचे अधिकृत भागभांडवल १० लाख आणि पेडअप कॅपिटल १ लाख रुपये आहे. गौरव कासट आणि दीपेश माधनी हे संचालक आहेत. सीआयएन क्रमांक यू २७३१३ एमएच २०१७ पीटीसी २९७४२९ आहे. ही कंपनी १,५२० कोटी रुपयांचा एक स्टील प्लांट उभारणार आहे.

३. राजुरी स्टील अँड अलॉय इंडिया प्रा. लि.

ही कंपनी इस्रायल/युरोपची असल्याचे नमूद आहे. ही मूळ चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. १२ जून २०१० रोजी नोंदणी झाली. त्याचे कार्यालय मुलुंड, पश्चिम मुंबई असे नमूद आहे. अधिकृत भागभांडवल १८ कोटी ५० लाख रुपये आहे आणि पेडअप कॅपिटल १८ कोटी ४८ लाख ८४ हजार ९९२ रुपये आहे. संचालकांमध्ये मोनिका जैन आणि विवेक बेरीवाल यांचा समावेश आहे. सीआयएन क्रमांक यू २८९९९ एमएच २०१० पीटीसी २०४१०० आहे. ही कंपनी मूल एमआयडीसीमध्ये ६०० कोटी रुपये खर्चून पोलाद प्रकल्प उभारणार आहे.

Web Title: The three companies that signed the agreement in Davos Economic Conference are from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.