झाडीपट्टीतील रंगमंचाची उणीव दूर करणार नाट्यगृह

By admin | Published: April 5, 2017 12:35 AM2017-04-05T00:35:32+5:302017-04-05T00:35:32+5:30

रामनवमीचा दिवस मूलवासीयांसाठी आनंदाचा ठरला. या दिवसाचा मुहूर्त साधून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्मवीर मा.सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृहाचे थाटात लोकार्पण झाले.

The theater away from the absence of shrubs | झाडीपट्टीतील रंगमंचाची उणीव दूर करणार नाट्यगृह

झाडीपट्टीतील रंगमंचाची उणीव दूर करणार नाट्यगृह

Next

कन्नमवार सांस्कृतिक सभागृहाचे थाटात लोकार्पण : श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय जनसेवेत रूजू
राजू गेडाम/ भोजराज गोवर्धन मूल
रामनवमीचा दिवस मूलवासीयांसाठी आनंदाचा ठरला. या दिवसाचा मुहूर्त साधून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्मवीर मा.सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृहाचे थाटात लोकार्पण झाले. तर, याच दिवसाचा मूहूर्त साधून मूलवासीयांच्या सेवेत शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय जनसेवेत रूजू करण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेवून या दोन्ही वास्तू मूल वासीयांच्या सेवेत सादर केल्या. भर उन्हातही मोठ्या उत्साहाने आलेली जनता आपल्या गावच्या पुत्राचे अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक न्यहाळत मोठ्या आनंदाने या सोहळ्यात सहभागी झाली होती. दुपारच्या रणरणत्या उन्हातही कर्मवीर मा. सा. कन्नमवार उपाख्य दादासाहेब यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी झालेला हा सोहळा म्हणजे मूलच्या विकासातील एक नवी पर्वणी ठरली.
ज्या महाराष्ट्रात कन्नमवारांनी सेवा केली त्या कन्नमवारांची ही कर्मभूमी आहे, त्यांच्याच नावाने सांस्कृतिक सभागृह उभे झाले. कन्नमवारांचे विचार चांदापासून तर बांद्यापर्यंत पोहचविण्याची तमची व माझी जबाबदारी आहे, ते आपण मिळून पूर्ण करु, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले, तेव्हा टाळ्यांच्या कडकडाने परिसर निनादून गेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख अतिथी म्हणून शोभाताई फडणवीस, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नाना शामकुळे, संजय धोटे, कीर्तीकुमार भांगडिया, विधान परिषदेचे सदस्य मितेश भांगडिया, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी मंत्री संजय देवतळे, भाजपाच्या तालुकाध्यक्ष संध्या गुरुनुले, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी स्व. मा.सा.कन्नमवाराचे वारसदार नंदा कन्नमवार, पुतणे सुरेश कन्नमवार, नात पद्मा जोगेवार, किशोर जोगेवार, डॉ. राहुल कन्नमावार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शाल व नटराजाची मूर्ती देवून स्वागत करण्यात आले. व मूर्तीकार अनुप पोहेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सुमारे १३ लाख रुपये खर्च करुन स्व. मा.सा. कन्नमवार यांच्या नावाने स्मारक उभारण्यात आले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र बुरांडे, शाखा अभियंता बाळू षटगोपनवार, बोबडे, पुरुषोत्तम मेश्राम यांनी काम पाहिले.
ना. मुनगंटीवार यांनी मनातील भावना बोलून दाखविली. ते म्हणाले, मुंबईत कलामंदिर आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कलाकाराची कमी नाही परंतु त्यांना व्यासपिठ उपलब्ध नाही. ही भूमी हिरा निर्माण करणाऱ्यांची आहे. त्यामुळेच हे व्यासपीठ मा.सां. कन्नमवारांच्या नावाने स्मारक तयार केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या समारंभादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मा.सा. कन्नमवार यांच्यावर आधारीत पुस्तिकेच प्रकाशन करण्यात आले. तसेच कॅशलेश व्यवहार करता यावे यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना पॉस मशिनचे वाटपही करण्यात आले.
नाट्यगृहातील कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र आरीकर यांनी केले. तर, जाहीर सभेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधीक्षक बालपांडे यांनी केले. संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले. उपस्थितांचे आभार नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी मानले.

वित्तमंत्र्यांचे कौतुक
राज्यात देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या रुपाने युवाजोडी मिळालेली आहे ही जोडी मोठ्या प्रमाणावर विकास करीत आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या दोघांचे कौतुक केले. तर, कर्मवीर कन्नमवारांच्या स्मारकासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या संघर्षाची जाणीव मुख्यमंत्र्यांनी सभेतून करून दिली. ज्या कॉंग्रेस पक्षाचे ते नेते होते तो पक्षच त्यांना विसरला. मात्र त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत त्यांचे स्मारक मूल शहरात उभारण्यासाठी ना.मुनगंटीवार यांनी केलेला संघर्ष अभिनंदनीय आणि आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

Web Title: The theater away from the absence of shrubs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.