चंद्रपूर जिल्ह्यात बुद्ध मूर्तीची चोरी; भंतेजींची कुटीही जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:52 AM2019-08-21T11:52:30+5:302019-08-21T11:52:57+5:30
मूल तालुक्यापासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या एका लहानशा टेकडीवर स्थापन केलेली ऐतिहासिक बुद्ध मूर्ती बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी पळवून नेली.
भोजराज गोवर्धन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मूल तालुक्यापासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या एका लहानशा टेकडीवर स्थापन केलेली ऐतिहासिक बुद्ध मूर्ती बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी पळवून नेली. तेथे राहत असलेल्या भिख्खूंच्या कुटीलाही त्यांनी आग लावून दिली. सुदैवाने तेथील भंते संघवंश थेरो हे काही कारणासाठी बाहेरगावी गेले असल्याने बचावले.
काही वर्षांपूर्वी जंगलात लाकूडफाटा गोळा करणाऱ्या एका महिलेला ही मूर्ती आढळून आली होती. १९ वर्षांपूर्वी या मूर्तीची स्थापना स्थानिक बौद्ध संघाने सदर ठिकाणी केली होती.
बुधवारी मध्यरात्री चोरट्याने ही मूर्ती उचलून नेली व जवळच्या कुटीलाही आग लावली. या घटनेचे वृत्त सर्वत्र पसरले असून नागरिकांत रोष आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.