डायमंड इंडेन गॅस गोदामातून गॅस सिलिंडरची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:57+5:302021-05-03T04:22:57+5:30

सास्ती : राजुरा तालुक्यातील सास्ती रस्त्यावरील धोपटाला गावाजवळ असलेल्या इंडेन गॅस गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या ...

Theft of gas cylinder from Diamond Inden gas depot | डायमंड इंडेन गॅस गोदामातून गॅस सिलिंडरची चोरी

डायमंड इंडेन गॅस गोदामातून गॅस सिलिंडरची चोरी

Next

सास्ती

: राजुरा तालुक्यातील सास्ती रस्त्यावरील धोपटाला गावाजवळ असलेल्या इंडेन गॅस गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या एकूण सहा भरलेल्या गॅस सिलिंडरची चोरी केली.

ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याविषयी राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

धोपटाला कामगार सहकारी पतसंस्थेच्या डायमंड इंडेन गॅस एजन्सीचे धोपटाला गावाजवळ गोदाम आहे. शनिवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान रस्त्यावरून जात असताना एका कोळसा खाण कामगाराला गोडाऊनचे प्रवेशद्वार उघडे दिसले. म्हणून त्यांनी पतसंस्थेचे अध्यक्ष रंगराव कुलसंगे यांना माहिती दिली. ते त्वरित गोडाऊन येथे आले असता समोरचे प्रवेशद्वार व आतील गोडाऊनचे दार उघडे दिसले. दोन्ही कुलूप तोडून समोरच्या बाजूला पडलेली होती. गोडाऊनकिपरने संपूर्ण सिलिंडरची मोजणी केली असता पाच घरगुती वापरायचे सिलिंडर, (१४.२ किलोग्राम ) आणि एक १९ किलोग्राम व्यावसायिक सिलिंडर चोरीला गेल्याचे उघड झाले. याची किंमत २० हजार रुपये आहे.

संस्थेचे अध्यक्ष रंगराव कुलसंगे यांनी त्वरित राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या गोडाऊनच्या जवळ एका चारचाकी वाहनाचे टायर आढळून आले. चोरट्यांनी चार चाकी गाडीतून हे सिलिंडर चोरी केले असावे, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. राजुरा पोलिसांनी भादंवि कलम ४६१ व ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे करीत आहेत.

Web Title: Theft of gas cylinder from Diamond Inden gas depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.