राष्ट्रसंतांच्या साहित्यातून उत्कृष्ट विद्यार्थी घडू शकतोे
By admin | Published: February 14, 2017 12:39 AM2017-02-14T00:39:26+5:302017-02-14T00:39:26+5:30
राष्ट्रसंतांच्या ग्रामगीताच्या माध्यमातून उत्कृष्ट विद्यार्थी घडू शकतो. त्यामुळे ग्रामगीतांचे वाचन करावे, असे प्रतिपादान ग्राम गीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.
बंडोपंत बोढेकर यांचे प्रतिपादन : घुग्घुस येथे दोन दिवसीय सर्वधर्म परिषद
घुग्घुस : राष्ट्रसंतांच्या ग्रामगीताच्या माध्यमातून उत्कृष्ट विद्यार्थी घडू शकतो. त्यामुळे ग्रामगीतांचे वाचन करावे, असे प्रतिपादान ग्राम गीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.
वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यस्मरण व सर्व संतांच्या स्मृतीप्रित्यर्थ वारकरी गुरुदेव सेवा भजन मंडळ घुग्घुसद्वारे आयोजित दोन दिवसीय सर्वधर्म परिषदेच्या कार्यक्रमाचे उद्घााटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरूकुंज मोझरीचे हळदे महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती विद्या मंदीर म्हातारदेवी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत जोशी, प्रा. संतोष गोहोकर, प्रा. धारपवार, मुख्याध्यापक वरारकर, प्रियदर्शनी कन्या विद्यालयाचे शिक्षक टोंगे, माजी पं.स. सदस्या लीलाबाई नवले आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रामध्ये सकाळी ५ वाजता हळदे महाराज यांचे हस्ते घटस्थापनेने दोन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्याकरिता वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावेळी ग्रामगीता अध्याय १०, संघटन शक्ती, व जीवन शिक्षण ग्रामगीता अध्याय १९, या विषयावर सदर वक्तृत्व स्पर्धा पार पडली. त्यामध्ये वर्ग ८ ते १० वीच्या घुग्घुस, म्हातारदेवी, बेलोरा येथील २२ विद्यार्थ्यांनी तर पदवीधर सहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सदर स्पर्धेत ८ ते १० च्या गटात किशन कश्यप प्रथम, पायल नवले द्वितीय, वृशाली जेऊरकर तृतीय यांनी तर पदवीधर गटात मेघा बावणे प्रथम, कोमल नवले द्वितीय, राकेश जुनघरे यांनी तिसरा क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून हळदे महाराज, बंडोपंत बोढेकर, रमाकांत माघारे यांनी केले.
यावर जि.प. शाळा गोवारी येथील विद्यार्थ्यांनी ‘मला वाचवा ही एकांकी’ सादर करून भ्रुण हत्या, व्यसनमुक्ती, बोगस डॉक्टर, बाल मजूर, गर्भ चाचणी या विषयावर पथनाट्य सादर केले. व उपस्थितांचे मने जिंकली. कार्यक्रमाचे संचालन घुग्घूस येथील ग्रामगीताचार्य गोपाल शिरपूरकर यांनी केले.
यावेळी घुग्घुस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतसेसाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)