गडचांदूरमध्ये पाणीपट्टी करात प्रचंड वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:57 PM2018-03-25T22:57:44+5:302018-03-25T22:57:44+5:30

येथील नगरपरिषदेने चालू वर्षांत पाणीपट्टी करात प्रचंड वाढ केली आहे. ही पाणीपट्टी करवाढ जिल्ह्यातील इतर नगर पालिकांच्या तुलनेत खूपच जास्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे.

There is huge increase in water taxation in Gadchandur | गडचांदूरमध्ये पाणीपट्टी करात प्रचंड वाढ

गडचांदूरमध्ये पाणीपट्टी करात प्रचंड वाढ

Next
ठळक मुद्देनागरिकात असंतोष : करवाढ रद्द करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमत
गडचांदूर : येथील नगरपरिषदेने चालू वर्षांत पाणीपट्टी करात प्रचंड वाढ केली आहे. ही पाणीपट्टी करवाढ जिल्ह्यातील इतर नगर पालिकांच्या तुलनेत खूपच जास्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. पालिकेने पाणीपट्टी करात केलेली भरमसाठ वाढ रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गडचांदूर शहरात पाण्याच्या दोन टाक्यांमधून तसेच बोअरींग मधून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. शहरात एकूण १ हजार १३० नळ कनेक्शनधारक आहेत. मात्र शहरातील बऱ्याच भागात नळाद्वारे पाणी पोहचत नसल्याची ओरड आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शहरात पाणी समस्या उद्भवत आहे.
सन २०१४-१५ मध्ये पाणीपट्टी कर ७२० रुपये होता. त्यात २०१५-१६ मध्ये वाढ करुन ९०० रूपये करण्यात आला. आता यात प्रचंड वाढ करुन १५०० रूपये करण्यात आला असून पाणीपट्टी करात वाढ करण्याबाबतचा ठराव ३० जून २०१७ ला झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे.
या ठरावानुसार सन २०१७-१८ मध्ये न.प. द्वारे पाणीपट्टी कर १५०० रूपये प्रमाणे वसूल केल्या जात आहे. ही वाढ अन्यायकारक असून कर तातडीने रद्द करण्याबाबत नवीन ठराव घ्यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. ९०० रुपयांवरुन सरळ १५०० रूपये पाणीपट्टी कर केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिंक भूर्दंड बसत आहे.

पाणीपट्टी कर व गृहकर अतिशय जास्त आहे. तो कमी करण्यासाठी पालिकेने नवीन ठराव घेणे आवश्यक आहे. त्यासंबंधी पालिकेला कळविले आहे.
- सचिन भोयर, गटनेते शिवसेना न.प. गडचांदूर.

पाणीकर वाढविण्याचा ठराव मागील सत्तारुढ नगरसेवकांनी घेतला. त्यावेळी आम्ही विरोध केला होता. मात्र आता पाणीकर कमी करण्यासाठी नवीन ठराव घेतला जाईल.
- निलेश ताजने, गटनेते,
राकाँ न.प. गडचांदूर .

३० जून २०१७ च्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार सन २०१७-१८ या वर्षाचा पाणीपट्टी कर ९०० रुपये ऐवजी १५०० रुपये करण्यात आला. याबाबत जाहीर सूचना प्रादेशिक वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतरच कर आकारणी करण्यात आली आहे.
- संजय जाधव मुख्याध्यापिकारी, न.प. गडचांदूर.

Web Title: There is huge increase in water taxation in Gadchandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.