गावांमधील विहिरींना पुनर्जीवित करण्याची गरज

By admin | Published: August 20, 2014 11:26 PM2014-08-20T23:26:02+5:302014-08-20T23:26:02+5:30

प्रत्येक गावात असलेल्या विहिरी पाणी मिळण्याचे एकमेव चांगले स्त्रोत आहे. इतर स्त्रोतांना वीज लागते किंवा त्यांना दुरुस्ती करण्याची गरज पडते. परंतु विहिरीला जर, दर सहा महिन्यातून

There is a need to revive the wells in the villages | गावांमधील विहिरींना पुनर्जीवित करण्याची गरज

गावांमधील विहिरींना पुनर्जीवित करण्याची गरज

Next

चंद्रपूर : प्रत्येक गावात असलेल्या विहिरी पाणी मिळण्याचे एकमेव चांगले स्त्रोत आहे. इतर स्त्रोतांना वीज लागते किंवा त्यांना दुरुस्ती करण्याची गरज पडते. परंतु विहिरीला जर, दर सहा महिन्यातून एकदा उपसा केला तर ग्रामपंचायतला कोणताही जास्तीचा खर्च येऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गावात असलेल्या विहिरींना पुनर्जिवीत करण्याची गरज असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे यांनी व्यक्त केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे आयोजित पाणी गुणवत्ता या विषयावर कार्यशाळेत बोलत होते. कार्र्यक्रमाला अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आषुतोष सलितात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विवेक बोंदे्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर मेश्राम, प्रयोग शाळा तंत्रज्ञ आनंद बोथे, प्रायमोव्हचे राज्य समन्वयक महेश कोडगीरे आदी उपस्थित होते.
कुंभारे म्हणाले, दूषित पाण्यामुळे आपल्याकडे अनेक लोक मृत्यू पावतात. एकीकडे आपला देश प्रगतिपथावर आहे. असे म्हणतो पण आजही आपण स्वच्छतेच्या बाबतीत मागे आहोत. आपल्याला स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वीज विभागाप्रमामे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्यांच्या योजना आहेत. त्या ठिकाणी एक दिवसाचा कोरडा दिवस पाळावा म्हणजे त्या ठिकाणच्या टाक्या स्वच्छ करता येतील किंवा कुठे काही दुरुस्ती असल्यास त्यावेळी ती दुरुस्ती करून घेता येईल. त्यामुळे टाक्यांमध्ये काही घाण असेल तर, ती स्वच्छ करता येईल. म्हणजे आपल्या गावात दूषित पाणी येणार नाही व आरोग्याला अपाय होणार नाही. लोकप्रतिनिधींसुद्धा आपल्या गावामधील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. त्याचप्र्रमाणे शासकीय यंत्रणेनेसुद्धा लोकांना नागरिसुविधा पुरवाव्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलिल म्हणाले, तालुका स्तरावरील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून पाणी गुणवत्तेत कोणतीही कुचराई किंवा हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. रासायनिक पाणी नमूने तपासणी वर्र्षातून एकदा करतो व जैनिक पाणी नमूने तपासणी वर्षातून चार वेळा करण्यात येते. ती शंभर टक्के करण्यावर भर द्यावा. ग्र्रामपंचायत स्तरावर पाणी नमूने तपासणी वर्षातून चार वेळा करण्यात येते ती शंभर टक्के करण्यावर भर द्यावा, ग्रामपंचायत स्तरावरील पाणी नमूने प्रयोग शाळेत शंभर टक्के पोहचले पाहिजे याची जबाबदारी प्रत्येकांनी पार पडली की, नाही याची शहानिशा पंचायत स्तरावरून करून जिल्हा परिषदेला कळवले पाहिजे. पाणी गुणवत्ता व स्वच्छतेच्या संदर्भात आपण सतर्क राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांनी कार्र्यशाळेचा उद्देश विषद केला. गावातील पाणी स्वच्छ कसे राखावे यासंदर्भात जलसुरक्षक, ग्रामसेवक, विस्तार अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी असेही ते यावेळी म्हणाले.
आयोजनासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्र्यक्रम व्यवस्थापक संजय धोटे, पाणी पुरवठा तज्ज्ञ अंजली डाहूले, जलनिरीक्षक करुणा खनके, माहिती शिक्षण संवाद तज्ञ प्रविण खंडारे, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ बंडू हिरवे, सनियंत्रण व मुल्यमापन तज्ज्ञ साजिद निजामी, वित्त निसंपादणूक तज्ज्ञ प्रफुल्ल मत्ते, समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, शालेय स्वच्छता तज्ज्ञ मनोज डोंगरे, नरेंद्र रामटेके, आशिया शेख,, सुवर्णा जोशी, अमोल मातने, किसन आकुलवार, अजय कोरडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्ह्यात जलसुरक्षक, ग्रामसेवकांची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)

Web Title: There is a need to revive the wells in the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.