उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:54 PM2017-10-28T23:54:59+5:302017-10-28T23:55:15+5:30

कुणबी समाज आजही विकासासापासून वंचित आहे. विद्यार्थ्यांना समाजासाठी कार्य करायचे असेल तर उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांपर्यंत पोहोचले पाहिजे, ....

There is no alternative without higher education | उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही

उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही

Next
ठळक मुद्देलेमराज लडके : कुणबी समाजाच्यावतीने सिंदेवाहीत प्रबोधनपर कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : कुणबी समाज आजही विकासासापासून वंचित आहे. विद्यार्थ्यांना समाजासाठी कार्य करायचे असेल तर उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. हेमराज लडके यांनी केले. सिंदेवाही द्वारा आयोजित स्नेहमिलनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी रमेश महाजन, महादेव अनवले, मनोहर पवार, कोटगले, भालतडक, कल्पना बरडे, डॉ. रोशनी राऊत आदींची उपस्थिती होती.
सोहळ्याची सुरुवात संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रास्ताविक कुणबी समाज संघटनेचे ज्येष्ठ सदस्य अ‍ॅड. साईदास नाकतोडे यांनी केले. याप्रसंगी लिलाबाई ब्राम्हणकर यांच्या मातोश्री शकुंतला यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. २०१६-१७ सत्रातील १० आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
१२ वीच्या परीक्षेत समाजातील विद्यार्थ्यांमधून यश रमाकांत महाजन या विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश मिळविल्याने कल्पनाताई बरडे यांचेकडून प्राचार्य अनंत बरडे यांचे स्मृतीप्रित्यर्थ रोख पारितोषिक देण्यात आले. उत्कर्ष मनोज ठक्कर याला वनपरिक्षेत्र अधिकारी झाडे यांच्याकडून २ हजार, १० वीच्या परीक्षेत साक्षी विस्तारी दोनाडकर व समृद्धी अमृत दंडवते यांना प्रत्येकी १ हत्जार रुपयांचे बक्षीस अ. भा. प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल अवसरे यांच्याकडून प्रदान करण्यात आला. डॉ. लडके अध्यक्षीय भाषणात म्हणाले, २५ वर्षांपासून कुणबी समाज आणि अन्य समदु:खी समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. सामाजिक कार्याची ही परंपरा यापुढेही सुरू राहणार आहे. विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असणाºया नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून सेवेचे कार्य निरंतर सुरू ठेवावे, असेही ते म्हणाले. संचालन अ‍ॅड. नाकतोडे यांनी केले. आभार प्रफुल्ल महाजन यांनी आभार मानले. आयोजनासाठी कुणबी समाज संघटनेचे गजानन बोढे, विनोद पिलारे, किंदरले, प्रा. नागलवाडे, प्रा. बेदरे, अतुल देशमुख, नवनाथ प्रधान, अनिल अवसरे, राजेंद्र चौधरी आदींनी सहकार्य केले.

Web Title: There is no alternative without higher education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.