बांधकामाच्या दर्जाबाबत तडजोड नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:27 AM2021-03-26T04:27:36+5:302021-03-26T04:27:36+5:30
मूल : कामचुकार कर्मचाऱ्यांसह निकृष्ट बांधकाम केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, अशा शब्दांत जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले ...
मूल : कामचुकार कर्मचाऱ्यांसह निकृष्ट बांधकाम केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, अशा शब्दांत जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी मूल पंचायत समितीच्या आढावा सभेत सुनावले.
या वेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा रेखा कारेकर, कृषी व पशु संवर्धन सभापती सुनील उरकुडे, महिला व बाल कल्याण सभापती, पं. स. मूलचे सभापती चंदू मारगोणवार, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज अवताडे, पं. स. सदस्या पूजा, वर्षा लोनबले, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी श्याम वाकर्ड, वित्त व लेखा अधिकारी अशोक मातकर, जि.प.चे महिला व बाल कल्याण अधिकारी संग्राम शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी अविनाश सोमनाथे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बांगरे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता बारसागडे, उपमुख्य कार्यकारी कपिल कलोडे, पचारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साठे, गट विकास अधिकारी डॉ. मयूर कडसे आणि संपूर्ण अधिकारी वर्ग उपस्थित होता. या वेळी संध्या गुरनुले यांनी पंचायत समितीतील विविध विभागांचा आढावा घेतला. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कृषी क्षेत्रात नवनवीन उपाययोजना, माती परीक्षण, जमिनीची सुपीकता कशी वाढविता येईल, शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावर दुग्ध केंद्र उभारण्यात यावे, बांधकाम विभागातील अंगणवाडी इमारत दुरुस्ती, किचन शेड बांधकाम, शौचालय बांधकाम, जिल्हा निधी, जिल्हा वार्षिक योजना, खनिज विकास निधी, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र देखभाल दुरुस्ती अशा विविध कामांवर चर्चा करण्यात आली. शिक्षण विभागातील शाळा व खोल्या दुरुस्ती, दर्जा, शिक्षण साहित्य, क्रीडांगणे, इमारत निर्लेखन प्रस्ताव, नवीन शाळांची मागणी, आवश्यक वर्ग खोल्यांची माहिती यावरही आढावा घेण्यात आला. या वेळी अनेक सरपंचांनी आपल्या गावातील समस्या मांडल्या.