घरकुल नाही तर मतदान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 10:31 PM2019-01-02T22:31:31+5:302019-01-02T22:31:47+5:30

चिमुर तालुक्यातील हिरापूर येथील ओबीसी समाजातील पात्र कुटुंंबांना घरकूल योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. दरम्यान, ३१ डिसेंबर २०१८ ला ग्रामपंचायतमध्ये आमसभा घेण्यात आली. ओबीसी कुटुंंबांना घरकूल मिळाले नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

There is no cottage and no polling | घरकुल नाही तर मतदान नाही

घरकुल नाही तर मतदान नाही

googlenewsNext
ठळक मुद्देहिरापूर आमसभेत ठराव : ओबीसी कुटुंबांवर अन्याय

लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर : चिमुर तालुक्यातील हिरापूर येथील ओबीसी समाजातील पात्र कुटुंंबांना घरकूल योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. दरम्यान, ३१ डिसेंबर २०१८ ला ग्रामपंचायतमध्ये आमसभा घेण्यात आली. ओबीसी कुटुंंबांना घरकूल मिळाले नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
हिरापूर ग्रामपंचायतमध्ये या वर्षात एकूण ४० घरकूल मंजूर करण्यात आले. पण पंचायत समितीने ओबीसींसाठी सन २०१३ ते १८ या कालावधीत फक्त चार घरकूल मंजूर केले. गावात ओबीसींची संख्या ६० टक्के आहे. यातील बहुतांश कुटुंबेआर्थिकदृष्ट्या मागास असून कुडाच्या राहतात. मागील १५ ते २० वर्षांपासून ओबीसी कुटुंबांना घरकूल योजनेतून वगळण्यात येत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसी समाजाला विविध योजनांचा लाभ मिळत नाही.
सरपंच, सचिव आणि ग्रा.पं. सदस्यांनी घरकूल मिळवून देण्याची जबाबदारी आमची नाही, असे जाहीरपणे सांगतात. ओबीसी नागरिकांची मागणी फेटाळून लावतात. यामुळे ओबीसी नागरिकामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मागील वर्षी याच गावात एका ग्रामपंचायत सदस्याला घरकूल मंजूर झाले. दरम्यान त्यांच्या दोन अविवाहीत मुले एकत्र कुटुंबात असतानाही आणखी दोन घरकूल मंजूर करण्यात आले होते. हिरापूर ग्रामपंचायतमध्ये असा भोंगळ भोंगळ सुरू आहे, असल्याची टीका आमसभेत नागरिकांनी केली.
बहुसंख्य ओबीसी समाज आर्थिक दृष्ट्या मागास असताना घरकूल योजनेपासून डावलणे सुरू असल्याने येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीता मतदानावर बहिस्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
यावेळी संदीप गुरनुले, हरिश पंचवटे, मनोज सोगलकर, रामदास चंदेलकर, शेखर आदे, विलास बघीले, पुंडलिक बघीले, रोशन डांगे आदींसह ओबीसी समाजाचे बहुसंख्य कुटुंब उपस्थित होते.

Web Title: There is no cottage and no polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.