जिल्ह्यात १७९९ शाळांत इंटरनेटच नाही; गुरुजींच्या मोबाइल आधारे शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:58+5:302021-07-14T04:32:58+5:30
वर्गखोल्या, संरक्षण भिंती बांधकाम, डागडुजीवर खर्च करण्यासोबतच जिल्हा परिषद प्रशासनाने याही महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात दोन ...
वर्गखोल्या, संरक्षण भिंती बांधकाम, डागडुजीवर खर्च करण्यासोबतच जिल्हा परिषद प्रशासनाने याही महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
जिल्ह्यात दोन हजार ५०४ एकूण शाळा आहेत. यातील एक हजार ७९९ शाळांमध्येच इंटरनेटची सुविधा आहे.
मागील दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट आले आहे. त्यामुळे अद्यापही शाळा सुरू झाल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, शासनाने आता ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. यातही ग्रामीण विद्यार्थ्यांकडे मोबाइल सुविधा नसल्यामुळे ते यापासून वंचित आहे. दुसरीकडे शाळांमध्येही इंटरनेट सुविधा नसल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही खासगी इंग्रजी शाळांमध्ये अद्यावत सुविधा आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना काही प्रमाणात ऑनलाइन शिक्षणाचे धडे मिळत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नसल्याने शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणासह शाळांची माहिती भरताना मोठी अडचण जात आहे. परिणामी गुरुजी अतिरिक्त पैसे भरून बाहेरून माहिती भरत आहेत तर ऑनलाइन अभ्यासक्रम स्वत:च्या मोबाइलद्वारे सुरू करण्यात आला आहे.
बाॅक्स
ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय रे भाऊ!
शिक्षक मोबाइलवर व्हिडिओ पाठवितात. ते आम्ही बघतो. तसेच पुस्तकाद्वारे स्वत:च अभ्यास करतो. कधी कधी आई-वडिलांची मदत घेतो.
- संजय मुसले
कोट
ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी मोबाइल घेतला. मात्र गावात नेटवर्कच नाही. त्यामुळे शिक्षकांद्वारे पाठविलेल्या अभ्यासक्रम समजत नाही.
- राहुल खुटेमाटे
--
शिक्षणाधिकारी म्हणतात...
जिल्हातील काही शाळांमध्ये ही सुविधा नाही. यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. काही ठिकाणी शिक्षकांच्या मोबाइलद्वारे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे.
- दीपेंद्र लोखंडे
शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद, चंद्रपूर
बाॅक्स
जिल्ह्यातील एकूण शाळा -
जिल्ह्यातील शासकीय शाळा
जिल्ह्यातील अनुदानित शाळा
विनाअनुदानित शाळा
बाॅक्स
शिक्षकांना मोबाइलचा आधार
जिल्ह्यातील शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये शिक्षक आपल्या मोबाइलद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रम पाठवितात. शासनाने प्रत्येक शाळांत इंटरनेट कनेक्शन देणे आवश्यक आहे. विशेषतः शाळांची माहिती ऑनलाइन भरावी लागते. अशावेळी शिक्षकांना बाहेरचा आधार घ्यावा लागतो.
प्रकाश चुनारकर
शिक्षक