चिमूरच्या अन्नपुरवठा विभागात नवीन शिधापत्रिकाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:32 AM2021-09-04T04:32:50+5:302021-09-04T04:32:50+5:30
चिमूर : चिमूर तहसील कार्यालयामधील अन्नपुरवठा विभागांतर्गत शिधापत्रिकाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अन्नपुरवठा केला जातो, परंतु काही शिधापत्रिका जीर्ण असल्याने किंवा ...
चिमूर : चिमूर तहसील कार्यालयामधील अन्नपुरवठा विभागांतर्गत शिधापत्रिकाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अन्नपुरवठा केला जातो, परंतु काही शिधापत्रिका जीर्ण असल्याने किंवा नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी प्रस्ताव दिला असता, शिधापत्रिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक लाभार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.
अन्नपुरवठा विभागांतर्गत बीपीएल, एपीएल व अंत्योदय शिधापत्रिका पुरविल्या जातात, परंतु काही शिधापत्रिका जीर्ण झाल्या असल्याने, नवीन तर काहींनी स्वतंत्र नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहे. तेव्हा लाभार्थी तहसील कार्यालयात गेल्यावर शिधापत्रिका उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लाभार्थ्यांना पायपीट करावी लागते. तहसील प्रशासनाने शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
कोट
चिमूर तहसील कार्यालयांतर्गत अन्नपुरवठा विभागात शिधापत्रिका उपलब्ध नाही. तालुक्यातील गोरगरीब जनतेला नाहक त्रास होत आहे. तहसील प्रशासनाने शिधापत्रिका उपलब्ध करून द्यावे.
- सावन गाडगे,ग्राम पंचायत सदस्य कवडशी(देश).
030921\img_20210903_131938.jpg
चिमूर तहसील कार्यालयातील
अन्न पुरवठा विभागात नवीन शिधा पत्रिका उपलब्ध नाही.