१३ तालुक्यात एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:26 AM2021-07-26T04:26:10+5:302021-07-26T04:26:10+5:30

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, बाधित आलेल्या सहा रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २, भद्रावती १, पोंभुर्णा १, कोरपना १ आणि इतर ...

There is no patient in 13 talukas | १३ तालुक्यात एकही रुग्ण नाही

१३ तालुक्यात एकही रुग्ण नाही

Next

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, बाधित आलेल्या सहा रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २, भद्रावती १, पोंभुर्णा १, कोरपना १ आणि इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा व जिवती व तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ९७८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार ३४१ झाली आहे. सध्या १०३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. सहा लाख ६ हजार २९३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख १७ हजार २४० नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात १,५३४ बाधितांचे मृत्यू झाले आहे. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी. पात्र नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: There is no patient in 13 talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.