शालेय पुस्तकांची विक्रीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:34 AM2021-09-07T04:34:22+5:302021-09-07T04:34:22+5:30
नद्यांच्या नावाची फलक लावावे चंद्रपूर : जिल्ह्यातील इरई, झरपट, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा शिरणा आदी नद्या वाहतात, परंतु ...
नद्यांच्या नावाची फलक लावावे
चंद्रपूर : जिल्ह्यातील इरई, झरपट, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा शिरणा आदी नद्या वाहतात, परंतु या नद्यांवर नद्यांच्या नावाचे फलक नसल्याने जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नदीच्या नावाबाबत अनभिज्ञता असते. चंद्रपूर जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात.
मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा
चंद्रपूर : शहरातील चोर खिडकी, बाबुपेठ, वडगाव, इंदिरानगर परिसरात मोकाट डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य असून, विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
झाडांच्या फांद्यांनी झाकोळले पथदिवे
चंद्रपूर : तालुक्यातील बहुतांश गावांमधील पथदिव्यांसमोर झाडाच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पोहोचत नाही. काही पथदिवे वेलींनी झाकोळले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पथदिव्यांसमोरील फांद्या तोडाव्या, अशी मागणी आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने झाडे वाढली आहेत.
नळयोजनांना तांत्रिक अडचणींचे ग्रहण
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या, परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याची ओरड आहे.
ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर
चंद्रपूर : अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नाही. शासनाकडून हागणदारी मुक्त राबविणे गरजेचे आहे.
मच्छरदाणीचे वाटप करण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यात डेंग्यू, टायफाइड, मलेरिया आदींच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातर्फे गरजूंना मच्छरदाणीचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली, तरी जिल्ह्यात डेंग्यूने पाय रोवले आहेत. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी मच्छरदाणीचे वाटप करावे, तसेच फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांना अनुदान वाढवून द्यावे
चंद्रपूर : सरकी ढेपीचे भाव गगनाला भिडल्याने दूध उत्पादक संकटात सापडले आहे. शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी गायी, म्हशी, शेळ्या आदी जनावरे पाळत आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे हा व्यवसाय डबघाईस येत आहे.
अंगणवाडी सुरू करावी
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे अद्यापही शाळा सुरु झाल्या नाही. परिणामी, विद्यार्थी गावभर फिरत आहे. मात्र, ग्रामीण भागातील मुलांचे आई-वडील शेतात जात असल्यामुळे मुलांना सुरक्षित कुठे ठेवायचे, हा प्रश्न सध्या ग्रामीण महिलांना पडत आहे. त्यामुळे अंगणवाडी सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.
जुन्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ
घुग्घुस : शहरात कोळसा खाणी, तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने प्रदूषण वाढले आहे.