राजुरा तालुक्यात ८१ गावात विलगीकरण कक्षच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:26 AM2021-05-17T04:26:22+5:302021-05-17T04:26:22+5:30

राजुरा : तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मृत्यूचा आलेख वाढत चालला आहे. अनेक कोरोना बधितांचा बेड व ...

There is no segregation room in 81 villages in Rajura taluka | राजुरा तालुक्यात ८१ गावात विलगीकरण कक्षच नाही

राजुरा तालुक्यात ८१ गावात विलगीकरण कक्षच नाही

Next

राजुरा : तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मृत्यूचा आलेख वाढत चालला आहे. अनेक कोरोना बधितांचा बेड व प्राणवायूअभावी मृत्यू झाल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. मुळात रुग्ण संख्या वाढीला 'ब्रेक' लावण्यासाठी ग्राम स्तरावर विलगीकरण कक्षाची गरज असते. पण, याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाबधितांना मोकळे रान मिळत आहे. गावात 'मोकाट' फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. राजुरा तालुक्यात अजूनही ८१ गावात विलगीकरण कक्षाची सोय नाही.

परिणामी पॉझिटिव्ह रुग्णांचा बेजबाबदारपणा संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात चांगलाच हाहाकार माजवला आहे. कोरोनाची पहिली लाट शहरापुरती मर्यादित होती. त्यामुळे ग्रामीण जनता बिनधास्त होती. पण, दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात शिरकाव केल्याने जनतेत भीतीने घर निर्माण केले आहे. त्यातच काही गावातील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ चांगलेच धास्तावल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या काही गावात तापाची साथ सुरू आहे. त्यामुळे अनेक गावांत कोरोना चाचणी केली जात आहे. यात बहुतेक तापाचे रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. पण, या कोरोना बाधितांची कुठे व्यवस्था करायची, असा प्रश्न आरोग्य विभागासमोर निर्माण झाला आहे. तालुक्यात ६५ ग्रामपंचायती असून, यात १११ गावांचा समावेश आहे. पण, मोजक्याच गावात विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. आजघडीला ३० गावांमध्ये कक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे आणि या केंद्रात गावातील कोरोना रुग्ण राहत आहेत. पण, उर्वरित ८१ गावात विलगीकरण कक्ष नसल्याने या गाव परिसरातील रुग्ण हे घरी आयसोलेट होऊन गावात मोकाट फिरत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांना मोकळे रान मिळत असल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. कोरोना बधितांच्या मोकाट फिरण्यामुळे गावात संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन गावात पर्यायी व्यवस्था तयार करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Web Title: There is no segregation room in 81 villages in Rajura taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.