पीकविमा काढूनही पिकांचे सर्वेक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2016 12:54 AM2016-10-26T00:54:27+5:302016-10-26T00:54:27+5:30

कोरपना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना अंमलात आणली.

There is no survey of crop after removing powdery | पीकविमा काढूनही पिकांचे सर्वेक्षण नाही

पीकविमा काढूनही पिकांचे सर्वेक्षण नाही

Next

शासन मस्त, शेतकरी त्रस्त : दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक अडचणीत
आशिष देरकर कोरपना
कोरपना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे हप्ते कापण्यात आले असले तरी पिकांचे सर्वेक्षणच न झाल्याने पीक विम्याचा उपयोग काय, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.
कापूस, सोयाबीन, भात, तूर या पिकांसाठी सदर योजना असून विविध चिंतेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक संजीवनी देणारी योजना ठरणार असे वाटले होते. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने ही योजना अभिनव ठरणार असल्याचे शासनाचे प्रतिनिधीही सांगत फिरत होते. मात्र हप्त्याच्या रूपाने शेतकऱ्यांचे पैसे तर गेलेच बदल्यात पदरात मोबदला मिळण्याची आशा शेतकऱ्यांना उरली नाही.
शासकीय परिपत्रकानुसार विम्याचा मोबदला मिळविण्याच्या अनेक अटी आहेत. अनेक शेतकरी गरीब व निरक्षर आहेत. त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळवावा, हे माहित नाही. बँक म्हणते म्हणून ते विमाधारी झाले. मात्र अपुऱ्या माहितीमुळे लाभार्थी होईल याची शास्वती देता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या विम्याची रक्कम पाण्यात जाईल एवढे, मात्र खरे. शासन व बँकांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांमध्ये योग्य जनजागृती केली नसल्याने अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.

कुठे गेले आधुनिक तंत्रज्ञान?
या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान कोणत्याही त्रृटी राहू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार होता. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस पडला यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतमालाचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे याची पाहणी करण्यासाठी ड्रोन, स्मार्ट फोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार होता. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञान कुठे गायब झाले, हा प्रश्नच आहे.

४८ तासांत द्यायची होती
नुकसानीची माहिती
शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यास ती माहिती संबंधित विभागाच्या टोल फ्री नंबरवर ४८ तासांत द्यायची होती. मात्र शेतकऱ्यांमध्ये याबाबत जनजागृती नसल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी फसवी ठरत आहे.

रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने काढला विमा
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कजार्तून बँकेच्या माध्यमातून रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने पीक विमा काढला. मात्र विम्याचा साधा पुरावा शेतकऱ्यांजवळ नसल्याने अनेक शेतकरी असुरक्षित आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही मोबदला मिळतो की नाही, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी मात्र पुरावा मागण्यात येणार आहे.

Web Title: There is no survey of crop after removing powdery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.