पौर्णिमेला जागूनही युगाचा सुगावा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:26 PM2018-08-26T23:26:33+5:302018-08-26T23:26:51+5:30
खंडाळा येथील युग अशोक मेश्राम हा बालक बेपत्ता होऊन चार दिवस झाले. शनिवारी संपूर्ण रात्र भर युगचे कुटुंबीय व पोलिसांनी जागून काढली. पण शोध लागला नाही. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी: खंडाळा येथील युग अशोक मेश्राम हा बालक बेपत्ता होऊन चार दिवस झाले. शनिवारी संपूर्ण रात्र भर युगचे कुटुंबीय व पोलिसांनी जागून काढली. पण शोध लागला नाही. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चर्चा सुरू झाली आहे.
दोन वर्षीय युग हा बुधवारी घरासमोरील चौकात खेळत असताना दुपारी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी सर्व पातळींवर शोधाशोध सुरू केली. या घटनेतील प्रत्येक पैलुंची कसून चौकशी केली जात आहे. शनिवारी पौर्णिमेच्या रात्री अनेक ठिकाणी चौकशी केली. रात्रभर जागून शोध घेणे सुरूच होते. पण युगचा अद्याप सुगावा लागला नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शक्यता रात्रभर तपासून पाहण्यात आल्या. पौर्णिमेच्या रात्री तालुक्यात काही अंधश्रद्धा प्रचलित आहेत. याचाही विचार करून काही ठिकाणी तपासणी करण्यात आली होती. परंतु या प्रयोगातूनही काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे युग बेपत्ता होण्याचे प्रकरण दिवसेंदिवस रहस्यमय होत आहे. युगच्या वडिलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या डोक्यावर तीन भोवरे आहेत. यामागे अपहरण अथवा कजलीप्रकरण असू शकते, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली जात आहे. चार दिवसांनंतरही युगचा काहीच सुगावा लागत नसल्याने पोलिसांवरही मोठा दबाव निर्माण झाला आहे.