अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना असावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:10 AM2017-12-05T00:10:37+5:302017-12-05T00:10:55+5:30

वीज निर्मिती करणाऱ्या अधिकारी, कर्मचाºयांमध्ये सांघिक भावना असावी. सांघिक भावना, व्यक्तिमत्व व कौशल्य विकासच्या माध्यमातून वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अधिक कार्यक्षमता वाढावी,....

There should be a team spirit among officials and employees | अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना असावी

अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना असावी

Next
ठळक मुद्देकैलास चिरूटकर : महानिर्मितीच्या नाट्यस्पर्धा सुरू

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : वीज निर्मिती करणाऱ्या अधिकारी, कर्मचाºयांमध्ये सांघिक भावना असावी. सांघिक भावना, व्यक्तिमत्व व कौशल्य विकासच्या माध्यमातून वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अधिक कार्यक्षमता वाढावी, यासाठीच नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्याचा महानिर्मितीचा मानस असतो, असे प्रतिपादन महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (संचलन) कैलास चिरूटकर यांनी केले.
येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात महानिर्मितीच्या आंतर विद्युत केंद्र नाट्य स्पर्धेच्या उदघाटनसमारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता जयंत बोबडे होते. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून कार्यकारी संचालक (सांघिक नियोजन व संवाद) सतीश चवरे, प्रभारी कार्यकारी संचालक(प्रकल्प) प्रदीप शिंगाडे, सिने अभिनेता अनिल पालकर, तसेच परीक्षक त्रयी अशोक आष्टीकर, अ‍ॅड. चैताली बोरकुटे, जयदेव सोमनाथे, महानिर्मितीचे उप मुख्य अभियंता नवनाथ शिंदे, राजू घुगे, अनिल आष्टीकर, मधुकर परचाके, गिरीश कुमरवार, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे, अग्निशमन सल्लागार शशिकांत पापडे, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भालचंद्र गायकवाड उपस्थित होते.
नाटय कलावंतांनी आपली भूमिका साकारताना परकाया प्रवेश सजगतेने करावा, हौशी व व्यावसायिक स्पर्धेतील फरक, परीक्षकाची नजर दिग्दर्शन, प्रकाश, संगीत, नेपथ्य, वेशभूषा इत्यादींवर असते, असे मत सिने अभिनेता अनिल पालकर यांनी व्यक्त केले.

Web Title: There should be a team spirit among officials and employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.