वेकोलिपुढे स्थानिक प्रशासन झाले हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:44 PM2017-11-04T23:44:42+5:302017-11-04T23:44:53+5:30
प्रकल्पासाठी शेतकºयांच्या जमिनी घेतल्यानंतर शेतीचा मोबदला आणि त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता नोकरी देण्याचा कायदा असतानासुद्धा अतिशिघ्र पद्धतीने वेकोलिने शेतकºयांच्या जमिनी...
लोकमत न्यूज नेटवर्क
रामपूर : प्रकल्पासाठी शेतकºयांच्या जमिनी घेतल्यानंतर शेतीचा मोबदला आणि त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता नोकरी देण्याचा कायदा असतानासुद्धा अतिशिघ्र पद्धतीने वेकोलिने शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहण करून प्रकल्पग्रस्त शेतकºयांची जाणीवपूर्वक सात-आठ वर्षापासून पिळवणूक करीत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
सद्यस्थितीत वेकोलि बल्लारपूर क्षेत्रामार्फत राजुरा तालुक्यातील साखरी, चिंचोली, सास्ती, धोपटाळा, भंडागपूर, कोलगाव, मानोली, मात्रा या गावातील सुमारे १८०० हेक्टर शेती अधिग्रहित करून दोनहजार प्रकल्पग्रस्त शेतकºयांचा नोकरीचा प्रश्न प्रलंबित आहे. यामध्ये साखरी ७३९.७९ हे., वरोडा ३८.७५ हे., चिचोली खुर्द ४२.१५ हे, धोपटाळा करिता ८२७.७२ हे. जमीन, चिचोली १८० हे. या सर्व शेतीवर विविध प्रकारचे सेक्शन लावून येथील चार हजार शेतकºयांवर शेती विकण्यास मज्जाव केला असून सोबतच शासकीय योजनेपासूनही वंचित केले आहे. सदर भागातील वेकोलिच्या प्रचंड प्रदूषणामुळे पीक घेणेही अवघड झाले आहे. यामुळे शेतकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व अन्यायाविरुद्ध वारंवार तक्रारी दिल्यानंतर स्थानिक प्रशासनाने लेखी आदेश दिले, जनप्रतिनिधींनीही वारंवार सूचना देऊनही वेकोलि प्रशासन लक्ष देत नसल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.
धोपटाळा ओपनकास्टकरिता जवळपास १०८० लोकांनी वेकोलि बल्लारपूर क्षेत्र यांना एक महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे. या एक महिन्यात धोपटाळा युजी टू ओसी या प्रकल्पाकरिता सकारात्मक निर्णय न घेतल्यास येथील खाणी बंद पाडण्यास एकमताने निर्णय घेण्यात आला असून त्यासंबंधी निवेदन वेकोलिला देण्यात आले आहे.