गोंदेडा परिसरात धानाचे पऱ्हे सडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2016 01:56 AM2016-07-18T01:56:11+5:302016-07-18T01:56:11+5:30

सतत सहा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे गोंदेडा व परिसरातील शेतातील धानाचे पऱ्हे सडले आहेत.

There was a rush of fire at Gondia area | गोंदेडा परिसरात धानाचे पऱ्हे सडले

गोंदेडा परिसरात धानाचे पऱ्हे सडले

Next

दुबार पेरणीचे संकट : अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका
पेंढरी (कोके) : सतत सहा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे गोंदेडा व परिसरातील शेतातील धानाचे पऱ्हे सडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांकडून होत आहे.
पेंढरी(कोके), केवाडा (पेठ) गोंदेडा, वडसी खातोडा, महादवाडी, मोटेगाव, गोरवट, काजळसर, खुटाळा, खांबाडा व इतर भागात ७ ते १२ जुलै पर्यंत रात्रंदिवस मुसळधार पाऊस झाला. यात अतिवृष्टी होऊन या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पऱ्हे सतत दहा दिवस पाण्याखाली राहिल्यामुळे सडून गेले आहेत. त्यामुळे त्यांचे रोवणे होणे कठीण आहे. सध्या दुबार पेरणीचे संकट ओढवले असून शासनाने पऱ्ह्याचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आनंद कावळे, तुकडोजी सोनुले, देवराव सोनुले, राजेराम सोनुले, सुरेश डांगे, सुधाकर वाढई व इतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)

Web Title: There was a rush of fire at Gondia area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.