मूल शहर व तालुक्यात विविध विकासकामे होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:39 AM2018-12-19T00:39:57+5:302018-12-19T00:40:26+5:30
मूल शहर व मूल तालुक्यातील रस्त्यांसह अनेक विकास कामांना अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हिरवी झेंडी दिली होती. या विकास कामांचे भूमिपूजन गुरुवार दि. २० डिसेंबरला ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मूल शहर व मूल तालुक्यातील रस्त्यांसह अनेक विकास कामांना अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हिरवी झेंडी दिली होती. या विकास कामांचे भूमिपूजन गुरुवार दि. २० डिसेंबरला ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
दुपारी २.३० वा. बोरचांदली येथे मुल-चामोर्शी रस्ता सुधारणेचे काम, कोळसा -झरी -पिंपळखुट-अजयपूर- केळझर-चिरोली- चिचाळा- ताडाळा-बोरचांदली - खेडी या कामांचे भूमीपूजन होईल. दुपारी ३.३० वा. भेजगांव येथे मरेगांव-आकापूर-चांदली-राजगड-फिस्कुटी-गडीसुर्ला-भेजगाव-पिपरी दीक्षित-थेरगाव -वेळवा - आष्टा फाटा-चक बल्लारपूर-वढोली-घाटकुळ तसेच केळझर स्टेशन-सुशी-नलेश्वर-मानकापूर-सिंताळा-भेजगाव-दुगाळा-नवेगाव बुज-कोरंबी तसेच उमरी तुकूम-आंबेधानोरा-डोंगरहळदी-सुशी-नलेश्वर-मानकापूर-हळदी-चिचाळा-फिस्कुटी-चांदापू रस्त्याची सुधारणा, मरेगाव-आकापूर-चांदली-राजगड-फिस्कुटी-गडीसुर्ला-भेजगाव-पिपरी दीक्षित-थेरगांव -वेळवा-आष्टा फाटा-चक बल्लारपूर-वढोली-घाटकुळ रस्ता सुधारणा कामांचे भूमीपूजन. ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा विशेष कार्यक्रमांतर्गत चिचाळा व नजिकच्या सहा गावांना शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्याकरिता मंजूर २३ कोटी ४७ लक्ष ५४ हजार रू. निधीअंतर्गत कामाचे भूमीपूजन सायं. ४.३० वा. चिचाळा येथे होणार आहे. नंतर चिचाळा येथे ते जाहीर सभा होईल. सायं. ७ वा. मुल शहरात शासकीय विश्रामगृह बांधकामाचे भूमीपूजन तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व नाला बांधकामाचे भूमीपूजन होईल. सायं. ७.१५ वा. मुल शहरातील पत्रकार भवनाचे लोकार्पण होईल. सायं. ७.३० वा. मूल उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण करून जाहीर सभेला ना. मुनगंटीवार संबोधित करतील.