मद्यपान न करताही होतात या आजारांमुळे लिव्हर खराब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:21 IST2025-03-07T15:20:38+5:302025-03-07T15:21:23+5:30

Chandrapur : मधुमेहामुळेही यकृताचे होऊ शकते नुकसान, प्रत्येक नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक

These diseases can cause liver damage even without drinking alcohol | मद्यपान न करताही होतात या आजारांमुळे लिव्हर खराब

These diseases can cause liver damage even without drinking alcohol

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
फक्त दारुमुळेच यकृत खराब होते, असा नागरिकांमध्ये समज आहे. हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, आनुवंशिक आजार, मधुमेहामुळेही यकृताचे नुकसान होऊ शकते. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार मद्यपान न करता चुकीच्या जीवनशैलीमुळे होऊ शकतो. शिवाय जास्त प्रमाणात मद्यपान, शारीरिक क्रियाशील नसणे यामुळे यकृताशी संबंधित समस्या वाढत आहेत.


लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हरचे प्रमाण महिला, पुरुष तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे दारू न पिणाऱ्यांनासुद्धा हा त्रास होऊ शकतो. आरोग्य सुदृढतेसाठी दररोज व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.


लिव्हर खराब होण्याची कारणे काय?
दारू हे यकृत खराब होण्याचे प्रमुख कारण मानले जाते व यकृतासाठी सर्वात हानिकारक आहे. अल्कोहोल डिहाइड्रेटिंग एजंट म्हणून कार्य करते. ज्यामुळे यकृताला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे शक्य होते.


दारू पीत नसलेल्यांचेही लिव्हर खराब !
अल्कोहोलचे सेवन न करणाऱ्या व्यक्तींमध्येही यकृतासंबंधित समस्या आढळून येतात. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार मद्यपान न करता चुकीच्या लाइफस्टाइलमुळे होऊ शकतो.


तेलकट-तिखट, मद्यपानाचाही फटका
मांस, ट्रान्स फॅट, प्रक्रिया केलेले कार्ब आणि प्रक्टोज यासारख्या वाईट आहाराच्या सवयींचे सेवन व मद्यपान यकृताला झपाट्याने नुकसान करते आणि यकृत निकामी होऊ शकते.


लिव्हर फायब्रोसिस व फॅटी लिव्हरचा काय संबंध ?

  • लिव्हर फायब्रोसिस आणि फॅटी लिव्हरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
  • या आजारामुळे जठरातील कोणत्याही प्रकारच्या संसर्गाशिवाय आणि मद्यपानाच्या सवयीशिवायही लिव्हरच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.


काय काळजी घ्याल?
लठ्ठपणा वाढल्यामुळे यकृतातील पेशींमध्ये चरबी जमा होते. यामुळे यकृत सिरोसिससारख्या समस्या होऊ शकतात. जास्त लठ्ठ आणि मधुमेही लोकांना असे होण्याची शक्यता जास्त असते. लठ्ठपणामुळे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगाचा धोका लक्षणीय वाढतो. त्यामुळे लठ्ठपणा वाढू न देणे आवश्यक आहे.


लिव्हर सिरोसिसची लक्षणे

  • थकवा, भूक न लागणे, अशक्तपणा ही सामान्य लक्षणे आहेत.
  • यकृत ८० टक्क्यांपर्यंत खराब होते, तेव्हा लिव्हर सिरोसिसची लक्षणे दिसतात.


"दारू पिणाऱ्यांना लिव्हरचा त्रास होतोच. अनेकवेळा दारू न पिणाऱ्यांनासुद्धा लिव्हरचा त्रास होऊ शकतो. याकरिता साधी जीवनशैली, संतुलित आहार, व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. जंक फूड कटाक्षाने टाळावे. यकृत निरोगी असेल तर आपले संपूर्ण शरीर योग्य प्रकारे कार्य करते."
- डॉ. अशोक वासलवार, हृदयरोग तथा मधुमेहतज्ज्ञ, चंद्रपूर

Web Title: These diseases can cause liver damage even without drinking alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.