मुनगंटीवारांच्या दातृत्वाने त्यांना मिळाला अन्नदाता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:00 AM2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:37+5:30
हॉटेल्सही कुलूप बंद झाल्यामुळे चंद्रपूरात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसह रुग्णालयात रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना दोनवेळेचे अन्न मिळणे दुरापास्त झाले. ही उपासमार माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना पाहवली नाही. त्यांनी लगेच ज्यांना अन्न मिळत नाही, त्यांच्यापर्यंत जेवणाचे डबे पोहचविण्याचा निर्णय घेतला आणि लगेच त्याची अंमबजावणी सूरू केली. याकामात भाजपचे पदाधिकारी तनमनाने सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ मार्चपासून राज्यात संचारबंदी लागू केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह शहराच्या व जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंदोबस्तामुळे सील झाल्या. परिणामी भोजनावळ बंद पडल्या. हॉटेल्सही कुलूप बंद झाल्यामुळे चंद्रपूरात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसह रुग्णालयात रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना दोनवेळेचे अन्न मिळणे दुरापास्त झाले. ही उपासमार माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना पाहवली नाही. त्यांनी लगेच ज्यांना अन्न मिळत नाही, त्यांच्यापर्यंत जेवणाचे डबे पोहचविण्याचा निर्णय घेतला आणि लगेच त्याची अंमबजावणी सूरू केली. याकामात भाजपचे पदाधिकारी तनमनाने सहभागी झाले. बुधवारी पहिल्याच दिवशी तब्बल २ हजार जेवणाचे डबे पोहचवून दिले. पोटात अन्नाचा घास जाताच ही मंडळी तृप्त झाली. याबाबत मुनगंटीवार यांच्या रुपाने आपल्याला गरजेच्यावेळी अन्नदाता मिळाल्याच्या भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहेत.
गरजूंना भोजन पुरविण्याच्या आ. मुनगंटीवार यांच्या संकल्पाला गुढीपाडव्याला प्रारंभ झाला असून बल्लारपूर शहरात वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली काशी सिंह, आशिष देवतळे, राजू गुंडेटी आदींनी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथील रुग्णांना, पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच गरजू नागरिकांना भोजन डबे वितरित केले.
चंद्रपूर शहरातसुद्धा जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, उपमहापौर राहुल पावडे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, डॉ मंगेश गुलवाडे, सूरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू यांनी विविध भागात गरजूंना भोजन डब्वे वितरित केले. प्रामुख्याने पोलीस कर्मचाऱ्यांना सकाळ-संध्याकाळ तीनशे डब्बे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांना २५० डब्वे तसेच शहरात विविध भागात गरजूंना मागणीनुसार भोजन डब्बे वितरित करण्यात आले. याबाबत माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अनेकजण उपाशी झोपत होते. पहिल्याच दिवशी तब्बल २ हजारांवर डब्बे पोहचवून त्यांची भूक क्षमविली. डब्ब्यांची मागणी वाढत आहे. एकही जण उपाशी पोटी झोपणार नाही. यासाठी आता दोन ठिकाणी भोजन शिजविले जात आहे. यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे हा एकमेव उद्देश सर्वांसमक्ष आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाचे पालन प्रत्येकांनी करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत कोणाची उपासमार होऊ देणार नाही.
आरोग्य विभागाला १ हजार सॅनिटायझर
जिल्हा आरोग्य केंद्राची संपर्ण यंत्रणा दिवसरात्र आरोग्य सेवा देण्याचे काम करीत आहे. हे काम करीत असताना त्यांच्या आरोग्यालाही धोका संभवू शकतो. ही मंडळी घरोघरी भेटी देत आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये. यासोबतच अन्य महत्त्वपूर्ण विभागातील अधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त यंत्रणा आपले कर्तव्य बजावत आहे. या सर्व विभागांना माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सॅनिटायझरचे वितरण केले. जिल्हा आरोग्य विभागाला तब्बल १ हजार सॅनिटायझर उपलब्ध दिले. त्यांनी अलिकडेच आपल्या कर्मचाºयांच्या आरोग्याला धोका होऊ नये म्हणून सॅनिटायझर खरेदी केले होते. हा साठा शेवटच्या टप्प्यात असताना आमदार मुनगंटीवार यांच्या मार्फतीने सॅनिटायझर प्राप्त झाल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत गदगद झाले होते.