‘ते’ ३१ वर्षांनी भेटले आणि म्हणाले, ‘आम्ही ए.एन.सी.ची मुलं !’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:28 AM2021-03-05T04:28:29+5:302021-03-05T04:28:29+5:30
३१ वर्षांनी भेटले आनंदनिकेतच्या १९९१ चे बॅचमेट्स ! वरोरा : वरोरातील आनंद निकेतन महाविद्यालयात शिकणारे १९९१ चे कला शाखेचे ...
३१ वर्षांनी भेटले आनंदनिकेतच्या १९९१ चे बॅचमेट्स !
वरोरा : वरोरातील आनंद निकेतन महाविद्यालयात शिकणारे १९९१ चे कला शाखेचे बॅचमेट्स तब्बल ३१ वर्षांनी गेट टु गेदरच्या निमित्ताने भेटले. ताडोबातील एका रिसॉर्टमध्ये निसर्गसानिध्यात झालेल्या या स्नेहभेटीत जुन्या आठवणींनी उजाळा देणाऱ्या आणि हरवलेल्या मैत्रीचा पुन्हा आनंद फुलवणाऱ्या ठरल्या.
महाविद्यालय सुटल्यावर आपआपल्या कार्यात वेगवेगळ्या शहरात रमलेल्या या सर्व वर्गमित्रांना आणि मैत्रिणींना आनंद खिरटकर आणि विद्या झापर्डे-उमाटे यांनी एक व्हाटॅस गृपची स्थापना करून एकत्र आणले. यातून ही स्नेहमिलनाची संकल्पना पुढे आली. मागील रविवारी तब्बल २७ जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वर्गाचे सीआर असलेले विलास मत्ते, विठ्ठल उपरे तसेच आनंद खिरटकर, धर्मदास गेडाम, संगिता एकरे-घुगल, विद्या म्हशाखेत्री-गलांडे आणि दिपकांता लभाणे-ठावरे हे पाहुणे होते. दिवंगत प्राध्यापक आणि वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दीपप्रज्वलनाने आणि फलकावरील रेषा जोडून ‘आम्ही एएनसीची मुलं !’ अशी अक्षरे प्रगटवणाऱ्या अभिवन संकल्पनेतून उद्घाटन झाले. सर्वांच्या मनोगतामधून या उपक्रमाप्रति कृतज्ञता व्यक्त झाली. विद्या झापर्डे यांनी ऑनलाईन संपर्क साधून या सत्राला हजेली लावली. जुन्या आठवणी जाग्या करत गोपालकृष्ण मांडवकर यांनी संचालन केले. प्रास्ताविक गुणवंत वाभीटकर यांनी तर सत्राचे आभार मधुकर बुरीले यांनी मानले.
‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ या दुसऱ्या सत्राचे संचालन दामोदर दोहतरे यांनी केले. महाविद्यालयाच्या इमारतीमधून आयुष्याला मिळालेले वळण, महाविद्यालयातील आठवणी, अनुभवलेले क्षण, एकमेकांच्या गमजीजमती अशा निखळ आनंदाला जणू उधाणच आले होते. सर्वांनीच मनमोकळेपणाने अनुभवकथन केले. याच सत्रात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आलेले गुणवंत वाभीटकर यांच्यासह मोतीराम पोतराजे, चंदू ढवळे या वर्गमित्रांचे वाढदिवस केक कापून साजरे करण्यात आले. या सत्राचे आभार कल्पना जेनेकर-बोढे यांनी मानले.
दुसऱ्या दिसशी सकाळी ताडोबा जंगल सफारीचा आनंद सर्वांनी लुटला. दुपारचे अंतिम सत्र निरोपाचे होते. बाबा जांगडे यांनी संचालन केले. पुढील स्नेहमिलनाची जबाबदारी भद्रावतीकर वर्गमित्रांवर सोपवून दामोदर दोहतरे यांच्याकडे आयोजनाची सूत्रे सोपविण्यात आली. राजू आगलावे, प्रदीप चट्टे, मोरेश्वर डुकरे, अरविंद साळवे, माया एकरे-बुट्टे, ज्योती रासेकर-तायडे, आशा तराळे, सुरेखा सूर-आसुटकर यांचा यात सहभाग होता. निरोपाच्या क्षणी सर्वांचीच मने हळवी आणि जड झाली होती. एकमेकांचा निरोप घेताना अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या.