‘ते’ पाणी अन्यत्र वळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:36 AM2018-09-14T00:36:30+5:302018-09-14T00:37:26+5:30

रामपूर येथील रामपूर वॉर्डातील सहकारनगरात वेकोलिचे खराब पाणी सोडल्या जात आहे. या पाण्यामुळे पिकांचे नुकसान सुरू असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. ही समस्या सुटली नाही तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 'They' turn the water elsewhere | ‘ते’ पाणी अन्यत्र वळवा

‘ते’ पाणी अन्यत्र वळवा

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : वेकोलिच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : रामपूर येथील रामपूर वॉर्डातील सहकारनगरात वेकोलिचे खराब पाणी सोडल्या जात आहे. या पाण्यामुळे पिकांचे नुकसान सुरू असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. ही समस्या सुटली नाही तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सहकार नगराला लागून वेकोलिची जागा आहे. वेकोलिचे पाणी सहकार नगरात येत असल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सहकारनगरपासून शहरातील देशपांडे वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डिपी प्लांटमध्ये उभारण्यात आला. वेकोलि आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्याचा मार्ग बंद झाला. दोन किलोमीटर चिखल तुडवित शेतामध्ये जावे लागत आहे. रस्ता व दोन्ही बाजुला नाली बांधकाम केल्यास रामपूर सहकारनगरच्या नागरिकांना थेट शहरण्यास कोणतीही अडचण राहणार नाही. याबाबत अनेकदा निवदने दिली पण रस्ता झाला नाही. वेकोलिच्या सांडपाण्यामुळे सहकार नगरमध्ये रोगराई पसरली. स्वच्छ भारत मिशनच्या फज्जा उडाला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील रस्ता व नाली त्वरीत तयार करून देण्याची मागणी सहकार नगरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title:  'They' turn the water elsewhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.