चिमूरच्या जामा मस्जिदमध्ये चोरी करणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:28 AM2021-09-03T04:28:22+5:302021-09-03T04:28:22+5:30
चिमूरचे इमाम अनिस जमील शेख हे घरी जेवण करून मस्जिदचे लाइट बंद करण्याकरिता मस्जिदकडे आले असता त्यांना मस्जीदच्या समोर ...
चिमूरचे इमाम अनिस जमील शेख हे घरी जेवण करून मस्जिदचे लाइट बंद करण्याकरिता मस्जिदकडे आले असता त्यांना मस्जीदच्या समोर एक टाटा इंडिगो कंपनीचे सिल्व्हर रंगाची चारचाकी वाहन उभे दिसले. मस्जिदचे आतील लाइट सुरू असल्याने ते बंद करण्याकरिता त्यांनी आत प्रवेश करताच त्यांना एक अनोळखी इसम मस्जिदमधील दान पेटीजवळ उभा दिसला. त्यानंतर तो चारचाकी वाहनात बसून पळून गेला. इमाम यांनी तात्काळ पोलीस स्टेशन चिमूर येथे फोनद्वारे माहिती देऊन दानपेटीची पाहणी केली असता दानपेटी नेहमीच्या ठिकाणावरून हलवून त्यामधील अंदाजे अडीच हजार रुपये चोरीस गेल्याचे समजले. पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख यांनी विद्युत कार्यालयाजवळ बॅरिकेट लावून आरोपीला थांबवून अटक केली. उमेरखा सजावरखा पठाण असे आरोपीचे नाव असून, तो जफरनगर, यवतमाळ येथील रहिवासी आहे.