चोरट्याची घरात शिरून घरमालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 05:00 AM2021-10-09T05:00:00+5:302021-10-09T05:00:48+5:30

काम आटोपून दुपारी दीड वाजताच्या सुमारास डॉक्टर सौरव व आजी घरी परतले. घरातील समोरच्या दरवाजाचे कुलूप तुटले होते. कुलूप लावले नसल्याचे समजत सौरवने घरात प्रवेश केला. तेव्हा आतील खोलीत चोरटा कपाटातील वस्तूचा शोध घेत होता. तेव्हा सौरवने चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. दोघांमध्ये झटापटी झाली. त्यात चोरट्याने सौरवच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून पळू काढला. नागरिकांनी त्याला पकडून एका घरात बंद करून पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले.

The thief broke into the house and beat the landlord | चोरट्याची घरात शिरून घरमालकाला मारहाण

चोरट्याची घरात शिरून घरमालकाला मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : दुपारी घरात कोणी नसल्याचे बघत दाराचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरची मंडळी काही वेळाने घरी परतली व सरळ घरात प्रवेश करताना चोरट्यासोबत धक्काबुक्की झाली. त्यात चोराने लोखंडी रॉडने घरमालकालाच मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर चोरट्याने पळ काढला. अवघ्या काही तासात युवकांनी चोरट्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना वरोरा शहरातील अभ्यंकर वाॅर्डात घडली.
डॉ. राजेंद्र ढवस आपल्या खासगी रुग्णालयात गेले होते. त्यांचा मुलगा डॉ. सौरव ढवस आपल्या आजीला घेऊन दुपारी स्टेट बँक व पोस्ट ऑफिसमध्ये गेला होता. तिथले काम आटोपून दुपारी दीड वाजताच्या सुमारास डॉक्टर सौरव व आजी घरी परतले. घरातील समोरच्या दरवाजाचे कुलूप तुटले होते. कुलूप लावले नसल्याचे समजत सौरवने घरात प्रवेश केला. तेव्हा आतील खोलीत चोरटा कपाटातील वस्तूचा शोध घेत होता. तेव्हा सौरवने चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. दोघांमध्ये झटापटी झाली. त्यात चोरट्याने सौरवच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून पळू काढला. नागरिकांनी त्याला पकडून एका घरात बंद करून पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष निपोनी, पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

 

Web Title: The thief broke into the house and beat the landlord

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर