चोर बिटी कापसाने संकटे वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:01 AM2018-05-06T00:01:49+5:302018-05-06T00:01:49+5:30

मागील हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माथी चोर बिटी बियाणे मोठ्या प्रमाणात मारण्यात आले. यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होवून कापसाची प्रतवारी खराब झाल्याने कापसाचे दर घसरले. त्यामुळे जिनिंग व्यवसायी व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.

Thieves Biti Kapas grew in disasters | चोर बिटी कापसाने संकटे वाढली

चोर बिटी कापसाने संकटे वाढली

Next
ठळक मुद्देउन्हाळी बाजारपेठ मंदावली : जिनिंग व्यवसायी व कापूस उत्पादकही चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मागील हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माथी चोर बिटी बियाणे मोठ्या प्रमाणात मारण्यात आले. यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होवून कापसाची प्रतवारी खराब झाल्याने कापसाचे दर घसरले. त्यामुळे जिनिंग व्यवसायी व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर उन्हाळ्याच्या उलाढालीमध्ये झाला असल्याने बाजारपेठही आर्थिक अडचणीत आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव, झरी, जामणी, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात रोखीने समजले जाणारे कापसाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असते. पांढऱ्या सोन्याची पंढरी म्हणून वरोरा तालुक्याला जनवैभव प्राप्त झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यासोबतच यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील कापूस विक्रीकरिता मोठ्या प्रमाणात आणला जातो. मागील हंगामात बिटी वाणाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली. बिटी कापूस बियाणांची लागवड केल्यास त्यावर रोग येत नसल्याचा समज शेतकऱ्यासह सर्वांचा झाला होता. मागील हंगामात पावसाने उसंत दिल्याने चोर बिटी बियाण्यामुळे यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आदी जिल्ह्यात कपाशीच्या पिकांची मशागत चांगली होवून पिक मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र त्यानंतर कापसाचे उत्पादन हाती येण्यापूर्वीच कापसाच्या बोंडाला गुलाबी अळीने ग्रासले. शेतात एकही कपाशीचे झाड गुलाबी बोंडअळीने सोडले नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांनी उभ्या कपाशीच्या पिकात नांगर फिरवून टाकल्याचा घटना घडल्या होत्या. गुलाबी बोंडअळीमधून कापूस निघाला. मात्र प्रतवारी घसरल्याने दरही घटले. त्यासोबत कापूस वेचणी करणारे व जिनींगमधील कामगारांना त्वचा रोग होणे सुरू झाल्याने शेतात व जिनींगमध्ये मजूरही सापडेना. मजूर सापडल्यास वेचणीचा दर प्रतिकिलो २० रूपयांपर्यंत गेला आणि दर दोन हजार रूपये क्विंटल मिळाला. जिनींगमधील कापूस काळा पडत असल्याने राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या गाठीच्या मागणीला मंदी आल्याने जिनींग व्यवसायी यावर्षीच्या हंगामात आर्थिक टंचाईमध्ये सापडला आहे. याचा परिणाम विवाह सोहळे व इतर बाजारपेठेवर झाला आहे.
सरकी तेल उत्पादनात घट
एक क्विंटल सरकीमधून १६ किलो तेल निघत होते. गुलाबी बोंडअळीने सरकीलाही खाल्ल्याने सध्या एका क्विंटल सरकीमधून दहा ते अकरा किलो तेल निघत आहे. त्यातून जनावरांच्या ढेपेलाही मागणी अत्यल्प आहे. याचा भुर्दंड जिनिंग व्यवसायिकांना बसत आहे.

Web Title: Thieves Biti Kapas grew in disasters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस