चोरांची टोळी अटकेत ; कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:56 PM2017-08-12T23:56:59+5:302017-08-12T23:57:26+5:30
पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन वर्षांपासून घरफोड्या करून धुमाकूळ घालणारी चार जणांची आंतरजिल्हा टोळी पोलिसांच्या हातात लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन वर्षांपासून घरफोड्या करून धुमाकूळ घालणारी चार जणांची आंतरजिल्हा टोळी पोलिसांच्या हातात लागली आहे. या टोळीने केलेल्या १० घरफोड्याही उघडकीस आल्या आहेत. या कारवाईत चोरीचा ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अजय केशव धकाते (४२) रा. उमरेड, भगतराम नसरू ढेकनकर (२८) रा. लिंगा जि. छिंदवाडा (मध्यप्रदेश), शुभम उर्फ लकी राजेशकुमार जैन (२६) इतवारा नागपूर, प्रमोद उर्फ मोबाईल तुम्ण गेडाम (२४) रा. रासा(घोंसा) वणी जि. यवतमाळ, अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, आरोपींकडून पोलिसांनी काही इलेक्ट्रॉनिक वस्तूही हस्तगत केल्या आहेत.
२०१६ व २०१७ या दोन वर्षात या टोळीने जैन मंदिर येथील दानपेटी, तुळाराम गजभिये रा. सुमठाना, विश्वेश्वर रघुनाथ कांबळे रा. सुरक्षानगर, नलीम अजय फुले, चंडीका वॉर्ड, प्रकाश नत्थूजी सैनाने रा. पांडववॉर्ड, अनिल परसूटकर गुरूनगर, प्राशीश ताठे रा. आशीर्वाद लेआऊट, संतोष जुनघरे झाडे प्लॉट या दहा जणांच्या घरी चोºया करून तब्बल ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. येथील ठाणेदार विलास निकम यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेशन विभागाचे महेंद्र इंगळे, पोउनि किशोर मित्तलवार यांनी चौघांना अटक या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत राजेश वºहाडे, सचिन गुरनुले, नरेश शेरकी, हेमराज प्रधान, केशव चिटघरे यांनी मोलाची कामगिरी बजावली. या आंतरजिल्हा टोळीकडून पुन्हा गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल न्यायालयातून हस्तगत करता येणार आहे, अशी माहिती ठाणेदार विलास निकम यांनी दिली.