जिवतीत चोर बिटी बियाण्यांनी केला शेतकऱ्यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:32 AM2018-10-05T00:32:21+5:302018-10-05T00:33:32+5:30

बळीराजाच्या डोक्यावर आधीच आर्थिक संकट कोसळले असताना आता चोर बिटी बियाण्यांनी घात केला आहे. जिवती ताललुक्यातील पाटण परिसरात चोर बिटी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

The thieves of the junket planted the seeds of the farmers | जिवतीत चोर बिटी बियाण्यांनी केला शेतकऱ्यांचा घात

जिवतीत चोर बिटी बियाण्यांनी केला शेतकऱ्यांचा घात

Next
ठळक मुद्देत्या वनकर्मचाऱ्यांकडून चोर बिटीची अवैध विक्री : शेतकऱ्यांची फसगत, बियाणे विकणाºयांवर कारवाई करा

फारूख शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : बळीराजाच्या डोक्यावर आधीच आर्थिक संकट कोसळले असताना आता चोर बिटी बियाण्यांनी घात केला आहे. जिवती ताललुक्यातील पाटण परिसरात चोर बिटी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील पाटण, नंदप्पा, कोलांडी, खडकी, हिरापूर, गोंदापूर येथील शेतकऱ्यांनी पाटण येथील एका वन कर्मचाऱ्यांच्या आमिषाला बळी पडून कापसाचे अवैध चोर बिटी बियाण्यांची खरेदी केली व शेतात लागवड केली. या बियाण्यांमुळे निंदनाचा खर्च कमी येतो, फवारणी करून गवत नाहिसे केले जाते, कापसाला काही होत नाही, कमी खर्चात जास्त पीक हाती येते, असे सांगून पाटण येथील एका वन कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना अवैधरित्या चोर बिटी बियाणे विकले. मात्र या बियाण्यांनी आता आपला रंग दाखविला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाला दोन-चार बोंडेच लागली असून शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने शेतकरी परशुराम वैलादी रा. नंदप्पा या शेतकºयाच्या शेतात भेट दिली असता त्याने आपली आपबिती सांगितली. आपली फसगत करणाऱ्या त्या वन कर्मचाऱ्याची तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चोर बिटीवर बंदी
जे कापसाचे वाण शासनातर्फे प्रमाणित नाही, अशा वाणांना बंदी घातली आहे. परंतु जिल्ह्यात काही एजंटकडून पैशाच्या हव्यासापोटी बंदी असलेल्या चोर बिटी बियाण्यांची विक्री केली जात आहे. याकडे कृषी विभागही कानाडोळा करीत आहे.

चुकीच्या औषध फवारणीमुळे कपाशी करपली
आक्सापूर : कृषी केंद्राने चुकीची व मुदतबाह्य कीटकनाशक औषधे पुरविली. ही औषधे फवारल्यामुळे चार एकरातील कपाशी करपली.
गोंडपीपरी तालुक्यातील चेकपिपरी येथील अल्पभूधारक शेतकरी रामचंद्र झाडे यांना भंगाराम तळोधी येथील सतीश कृषी केंद्राकडून चुकीची व मुदताबाह्य कीटकनाशक औषध पुरविण्यात आली. हंगामाच्या शेवटी तोंडातील घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रामचंद्र झाडे यांनी २२ सप्टेंबरला भंगाराम तळोधी येथील सतीश कृषी केंद्र येथून बुम फ्लावर, मोनो व ग्रोमोक्सोवन व सोबत तणनाशक असे दोन हजार २०० रुपयांचे औषध खरेदी केले. या औषधाचे बिल मागितले असता जवळच्या व्यक्तीला बिलाची काय आवश्यकता, असे म्हणून बिल दिले नाही. शेतकऱ्याने ३० सप्टेबरला फवारणी केली व लगेच दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन बघितले असता संपूर्ण कपाशी करपून गेली होती. ते बघून रामचंद्र झाडे यांना धक्काच बसला. पीक गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. झाडे यांनी कृषी विभाग गोंडपिपरी यांच्याकडे तक्रार केली असून कृषी केंद्रावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: The thieves of the junket planted the seeds of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.