बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका रिपब्लिक विचाराची

By Admin | Published: May 26, 2016 02:02 AM2016-05-26T02:02:49+5:302016-05-26T02:02:49+5:30

२६ जानेवारी १९५० नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिक विचाराची भूमिका संविधानातून निर्माण केली.

Think of the role of Babasaheb Ambedkar in the Republican | बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका रिपब्लिक विचाराची

बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका रिपब्लिक विचाराची

googlenewsNext

भय्या रामटेके यांचे प्रतिपादन : रिपब्लिक साहित्य संमेलन
राजुरा : २६ जानेवारी १९५० नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिक विचाराची भूमिका संविधानातून निर्माण केली. पारतंत्रातील राजकीय व अराजकीय संघटन म्हणजे शेड्युल कॉस्ट फेडरेशन व समता सैनिक दल विसर्जीत केले आणि गणतंत्रातील राजकीय संघटन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया व अराजकीय संघटन रिपब्लिक ट्रेनिंग स्कूलची स्थापना केली. परंतु परंपरावादी अनुयायींनी मातृ संघटनेच्या नावावर राजकीय व अराजकीय संघटन नेस्तनाबुत केल्याची माहिती संमेलनाध्यक्ष भय्या रामटेके यांनी दिली.
स्थानिक बुद्धभूमीत राजुरा रिपब्लिकन ट्रेनिंग स्कूल महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने अखिल भारतीय दुसरे रिपब्लिक साहित्य संमेलन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
या संमेलनाचे उद्घाटन तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी केले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून रिपब्लिकन साहित्यिक भैय्या रामटेके, प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्णाबोधी, मधू बावलकर, डॉ. इन्नय्या उम्मडी, चरणदास नगराळे उपस्थित होते. यावेळी रामटेके पुढे म्हणाले, दोन खासदार असलेली भाजपा केंद्रात बहुमतात आली. बहुमतासाठी नरेंद्र मोदी यांनी १६ मे २०१४ ला पाच पिढीचे आभार मानले व शंभर वर्ष जुनी पारतंत्राचे आठवण करुन ६५ वर्षाच्या गणतंत्राला पंतप्रधान मोदी विसरले, अशी आठवण संमेलनाध्यक्ष भैय्या रामटेके यांनी यावेळी करून दिली. संमेलनात देशातील हजारो प्रतिनिधींनी सहभाग दर्शविला. यापूर्वी पहिले रिपब्लिक साहित्य संमेलन आदिलाबाद तेलंगाना येथे पार पडले होते. रिपब्लिकन कवी संमेलनाचे संचालन प्रा. प्रशांत वंजारे यांनी केले. हे कवी संमेलन ज्येष्ठ कवी भाऊराव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी देशातील कवींनी उत्स्फूर्ततेने सहभाग घेतला. रिपब्लिक साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक चरणदास नगराळे यांनी केले. संचालन प्रा. प्रशांत मोरे यांनी केले. आभार शुद्धोधन निरांजने यांनी मानले.

Web Title: Think of the role of Babasaheb Ambedkar in the Republican

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.