मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चाची तिसरी बैठक
By admin | Published: October 4, 2016 12:43 AM2016-10-04T00:43:45+5:302016-10-04T00:43:45+5:30
१९ आॅक्टोबरला चंद्रपुरात मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होऊन महिना उलटत आला, तरी अद्याप मुलाखतीची प्रक्रिया जाहीर झालेली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला कुलसचिव निवडीला मुहूर्त कधी सापडणार? अशी विचारणा विद्यापीठाशी संबंधित घटकांकडून होत आहे.
वर्षभरातून प्रभारी असलेल्या कुलसचिव पदासाठीची निवड प्रक्रिया विद्यापीठाने दि. २७ मेपासून सुरू झाली. त्याअंतर्गत प्रशासनाने दि. १६ जूनपर्यंत आॅनलाईन अर्ज मागविले होते. त्यानुसार ५० जणांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. या अर्जाची प्रत विद्यापीठ कार्यालयात जमा करावयाची मुदत दि. २१ जूनपर्यंत होती. या मुदतीपर्यंत आणि वेळेत २८ जणांचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. त्यांच्या छाननीतून मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी १७ उमेदवार पात्र ठरले आहेत. या पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि. १२ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या हॉलमध्ये घेण्याचे नियोजन केले होते. आठ सदस्य असलेल्या कुलसचिव निवड समितीतर्फे संबंधित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच विद्यापीठ प्रशासनाने या मुलाखतीची प्रक्रिया लांबणीवर टाकली आहे. त्याचे कारण प्रशासनाने स्पष्ट केलेले नव्हते. (प्रतिनिधी)