बोंडअळीचा तिसरा टप्पा मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 10:05 PM2018-10-07T22:05:04+5:302018-10-07T22:05:22+5:30

तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले बोंडअळीचे प्रलंबित असलेले सहा कोटी ४८ लाख २५ हजार रुपये अनुदान तहसील कार्यालय येथे जमा झाले आहे.

The third stage of the Bondalya got | बोंडअळीचा तिसरा टप्पा मिळाला

बोंडअळीचा तिसरा टप्पा मिळाला

Next
ठळक मुद्देसहा कोटी ४८ लक्ष २५ हजार रुपये अनुदान जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले बोंडअळीचे प्रलंबित असलेले सहा कोटी ४८ लाख २५ हजार रुपये अनुदान तहसील कार्यालय येथे जमा झाले आहे.
मागील वर्षी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांच्या कपाशी पिकांचे नुकसान झाले होते. त्याअनुषंगाने राज्य शासनाने शेतकºयांना बोंडअळीची मदत जाहीर केली होती. त्यानुसार कोरपना तालुक्याला दोन टप्पे शासनाकडून मदत आली होती. परंतु तिसरा टप्पा जमा झालेला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी वर्ग अनुदानापासून वंचित होते.
बोंडअळीच्या तिसºया टप्प्याचे अनुदान लवकरात लवकर राज्य सरकारकडून शेतकºयांना प्राप्त करून द्यावे, अशी मागणी तालुक्यातील अनेक शेतकºयांनी आमदार अ‍ॅड.संजय धोटे यांच्याकडे केली होती. तसेच २१ सप्टेंबर २०१८ ला तहसील कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली होती. तेव्हा आमदार अ‍ॅड.संजय धोटे यांनी आपण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्या माध्यमातून शासनातर्फे सदर प्रलंबित असलेले अनुदान मिळवून देऊ, असे अश्वासन दिले होते. त्यांनी सदर अश्वासनाची पूर्तता करत आमदार धोटे यांनी सहा कोटी ४८ लक्ष २५ रुपये अनुदान शेतकºयांना मिळवून दिले. लवकरच सदर अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार असून तालुक्यातील ज्या शेतकºयांचे बोंडअळीबाबत बँक खाते क्रमांक चुकीचे आहे, त्यांनी सुधारित बँक खाते क्रमांक तलाठ्याकडे जमा करावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: The third stage of the Bondalya got

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.