बोअरवेलच्या पाण्यावर भागते तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:26 PM2019-05-30T22:26:41+5:302019-05-30T22:27:05+5:30
राजुरा तालुक्यातील ३२५ लोकसंख्या असलेल्या निर्ली गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नागरिकांची तहान भागविणाऱ्या सरकारी बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या. गावात पाण्याचे संकट उभे राहिल्याने नागरिकांना नाईलाजाने शेतातील बोअरवेलचे पाणी आणावे लागत असल्याने निर्लीवासीयांची रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : राजुरा तालुक्यातील ३२५ लोकसंख्या असलेल्या निर्ली गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नागरिकांची तहान भागविणाऱ्या सरकारी बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या. गावात पाण्याचे संकट उभे राहिल्याने नागरिकांना नाईलाजाने शेतातील बोअरवेलचे पाणी आणावे लागत असल्याने निर्लीवासीयांची रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.
चार्ली ग्राम पंचायत अंतर्गत येणाºया निर्ली गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया नळयोजनेची विहिरी आटली आहे. गावात चार सरकारी हातपंप तर एक विहिर आहे. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता निर्ली येथील सरपंच पोर्णिमा प्रदिप दुबे यांनी गावालगत असलेल्या प्रमोद धांडे यांच्या शेतातील बोअरवेलवरून गावकऱ्यांना पाण्याची सोय करून दिली आहे. आजघडीला शेतातील या एका बोअरवेलवरून अख्खा गाव पाणी भरत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत प्रमोद धांडे यांनी गावकºयांच्या सोयीसाठी पाणी उपलब्ध करून दिल्याने गावकरी या बोअरवेलच्या पाण्यावर आपली तहान भागवित आहे. पाणी टंचाईने ग्रस्त झालेल्या गावांकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने निर्लीवासीयांना ४७ अंश सेल्सीअसच्या उष्ण तापमानात शेतातील बोअरवेलवरून पाणी आणण्याचा दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्लीवासियांसाठी पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करून द्यावी अशी मागणी गट ग्राम पंचायत निर्लीच्या सरपंच पौर्णिमा दुबे, भाऊराव क्षीरसागर, प्रदिप दुबे, केतन धांडे, सुनिल वनकर, आकाश धांडे, रविंद्र दुबे, मंजुळाबाई धांडे, बाळा धांडे, गिताबाई धांडे, सुनिल धांडे यांनी केली आहे.
निर्ली गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता गावाशेजारील शेतातील एका बोअरवेलवरून गावकºयांच्या पाण्याची तात्पुरती सोय करून दिली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गावाकडे लक्ष देवून नागरिकांच्या पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करून द्यावी.
-पौर्णिमा दुबे
सरपंच, गट ग्रामपंचायत निर्ली