राजुऱ्यात साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 06:00 AM2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:44+5:30
दारुची वाहतूक होत असल्याची माहिती राजुरा पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसाननी सोनापूर ते भेदवी मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी बोलेरो पीकअप वाहन व बुलेरो प्लस या वाहनाचा पाठलाग करुन वाहनातून देशी दारू संत्राचे ४२ बॉक्स जप्त केले. यावेळी दोन्ही वाहन व दारु पकडून एकूण १३ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करुन वाहनातून १३ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सहा जणांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी सोनापूर ते भेदवी मार्गावर करण्यात आली. मेहताज नशीब अली, रामा नामदेव गोत्तमवर, चांद आशा अमीर शेख, आकाश शंकर कल्पे, शिवाजी विठ्ठल सुवर्णकार, अखिल सारफुद्दीन शेख असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत.
दारुची वाहतूक होत असल्याची माहिती राजुरा पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसाननी सोनापूर ते भेदवी मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी बोलेरो पीकअप वाहन व बुलेरो प्लस या वाहनाचा पाठलाग करुन वाहनातून देशी दारू संत्राचे ४२ बॉक्स जप्त केले. यावेळी दोन्ही वाहन व दारु पकडून एकूण १३ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि प्रशांत साखरे, संपत पुलिपाका, योगेश पिदूरकर, लक्ष्मण देशवेणी, दत्त नागरे, तिरुपती जाधव, गोपी नरोटे आदींनी केली.
सरपंचाला दारूविक्री करताना अटक
घोडपेठ : येथून जवळच असलेल्या घोट निंबाळा येथील सरपंच भीमा चरणदास रामटेके याला दारूविक्री करताना भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. सदर कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली. त्याच्याकडे १०० देशी दारूच्या निप असा एकूण १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन न्यायालयात हजर करण्यात आले. सदर कारवाई ना. पो. शि. रामप्रसाद नैताम, शाबाज सय्यद, मनीष चांदेकर यांनी केली. पुढील तपास ठाणेदार सुनिलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.