हातातोंडाशी आलेला यंदाचा कापूस बोंडअळी हिसकावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 11:11 PM2022-11-15T23:11:33+5:302022-11-15T23:12:16+5:30

सद्यस्थितीत कपाशीला बोंडे आली. मात्र, गुलाबी बोंडअळीचा कहर सुरू झाल्याने नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत उपाययोजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यासोबतच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कापूस विकास कार्यक्रमांतर्गत ८ हजार २०० फेरोमेन ट्रॅप व १६ हजार २२ ल्युर्सचे शेतकऱ्यांना वाटप केले.

This year's cotton bollworms will grab the handfuls | हातातोंडाशी आलेला यंदाचा कापूस बोंडअळी हिसकावणार

हातातोंडाशी आलेला यंदाचा कापूस बोंडअळी हिसकावणार

googlenewsNext
ठळक मुद्देखबरदारीसाठी एक लाख २८ हजार शेतकऱ्यांना पाठविले एसएमएस

 लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात यंदा १ लाख ७४  हजार ९६२ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली. कापूस पीक सध्या बोंड अवस्थेत आहे. काही ठिकाणी वेचणी सुरू झाली. मात्र, गुलाबी बोंडअळीने कहर केल्याने हातातोंडाशी आलेला कापूस उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली. कृषी विभाग अलर्ट झाला. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एम-किसान पोर्टलवरून १ लाख २८ हजार  २६५  शेतकऱ्यांना कापूस पिकाचे १५ एसएमएस पाठविण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत कपाशीला बोंडे आली. मात्र, गुलाबी बोंडअळीचा कहर सुरू झाल्याने नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत उपाययोजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यासोबतच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कापूस विकास कार्यक्रमांतर्गत ८ हजार २०० फेरोमेन ट्रॅप व १६ हजार २२ ल्युर्सचे शेतकऱ्यांना वाटप केले. याशिवाय क्रॉपसॅप अंतर्गत कापूस पीक लागवड करीत असलेल्या तालुक्यांत २८० निश्चित प्लॉटसाठी ११२० फेरोमेन ट्रॅप व ३३ हजार ६० ल्युर्स वाटप, गुलाबी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे १६० फ्लॅशकार्ड तयार केले. क्रॉपसॅप योजनेंतर्गत आपत्कालीन परिस्थितीसाठी १५०.५ लीटर इमामेक्टीन बेन्झोएट रासायनिक किटकनाशकांचा पुरवठा करण्यात आला आहे.

उत्पादन घटणार ?

यंदा कपाशीची स्थिती चांगली होती. पूरक पाऊस पडल्याने पिकाची उत्तम वाढ झाली. मात्र काही दिवसापासून बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदा उत्पन्न घटू शकते. 

क्रॉपसॅप अंतर्गत जिल्ह्यात २२१ कृषी सहायकांद्वारे १४ हजार ५०४ व ५० कृषी पर्यवेक्षकांनी ३ हजार २०० पीकनिहाय सर्वेक्षण केले. त्यांच्यामार्फत २ हजार ५५६ गाव बैठका घेतल्या. गुलाबी बोंडअळी निर्मूलनासाठी १३७ गावांत दवंडी दिली. गुलाबी बोंडअळी ही बोंडात असल्याने प्रादुर्भाव लक्षात येत नाही. त्यामुळे नियमित सर्वेक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 -भाऊसाहेब बहाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

 

Web Title: This year's cotton bollworms will grab the handfuls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.