‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी

By Admin | Published: May 12, 2014 11:28 PM2014-05-12T23:28:48+5:302014-05-12T23:28:48+5:30

तालुक्यातील उदापूर गावात एका सहा महिन्याच्या चिमूरडीवर २२ वर्षीय सुरज करामकर याने अत्याचार केल्या प्रकरणी त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी,

'Those' Naradhaamma should be hanged | ‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी

‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी

googlenewsNext

ब्रह्मपुरी : तालुक्यातील उदापूर गावात एका सहा महिन्याच्या चिमूरडीवर २२ वर्षीय सुरज करामकर याने अत्याचार केल्या प्रकरणी त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सर्वस्तरातून केली जात आहे.

ब्रह्मपुरीपासून काही अंतरावर उदापूर हे लहानसे खेडेगाव आहे. उदापूर येथे मोठय़ा उत्साहात रावण दहनचा कार्यक्रम मागील अनेक वर्षानुवर्षे उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. ब्रह्मपुरीतील बहूतांश नागरिक या ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी जातात. अशा धार्मिक गावात विकृती निर्माण झाली आहे. कुठल्याही नात्याची जाण नाही. आई-बाबा शिवाय ओळख नाही. हसण्याचे वय व आईच्या कुशीत मायेचा पांघरून घेऊन खेळत राहणे हा नित्यक्रम असताना एका क्रुरक्रमाने गिधाडा सारखी झडप मारावी तसेच घडून आले.

व्यवसायाने मेटॅडोर चालक, व्यसनाच्या आहारी पूर्णपणे बुडालेला सुरज करामकर हा विकृतीपलीकडे जाईल असे स्वप्नातही कोणालाही समजले नसेल. नाते संबंधात येत असल्याने आईचा थोडसा विश्‍वास बसला व त्या विश्‍वासाचा फायदा या नराधमाने घेतला. गावातून मेटॅडोरनी फिरवून आणतो असे सांगताच आईने विश्‍वास ठेवला व क्रुरक्रमाने विकृतीची परिसिमा गाठली.

बिचार्‍या चिमूरडीची प्रकृती अजूनही खालावली आहे. ती अजूनही पूर्णपणे बरी झाली नाही. गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. परंतु हा घृणास्पद प्रकार पाहून अनेकांची मने सुन्न झाली. ज्येष्ठापासून ते लहन्यापर्यंत अशा प्रकारची घटना पाहून तोंडात शब्द फुटण्याचेही शक्ती नाही. केवळ डोळ्याच्या भाषेतून विचार करायला भाग पाडण्यासारखी स्थिती या परिसरात निर्माण झाली होती. अजूनही हा विषय चर्चेमध्येच आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी एकच शब्द निघतो तो म्हणजे त्यानराधमाला फाशीची शिक्षा द्यायला हवी. विशेष म्हणजे, अशा घटनांवर अळा घालण्यासाठी प्रभोधनही करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Those' Naradhaamma should be hanged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.