‘त्या’ दिव्यांग विद्यार्थ्यांनी संपूर्ण रात्र काढली आंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:36+5:302021-07-01T04:20:36+5:30
नागभीड येथे स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची निवासी शाळा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्या तरी अनाथ असलेली काही ...
नागभीड येथे स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची निवासी शाळा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्या तरी अनाथ असलेली काही दिव्यांग मुले शाळेतच वास्तव्यास आहेत. या शाळेवर वीज मंडळाचे २० हजार २३० रुपयांचे वीज बिल थकीत होते. वीज वितरण कंपनीकडून शाळेच्या संचालकांना बिल भरण्यासंदर्भात सूचना करण्यात आली. वेळेवर एवढी रक्कम नसल्याने मुलांचा विचार करून एक-दोन दिवस थांबा, बिल भरतो असे शाळेच्या संचालकांकडून अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. मात्र वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काहीएक न ऐकता सोमवारी संध्याकाळी वीजपुरवठा खंडित केला.
शाळेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती मिळताच शाळेच्या संचालकांनी त्वरित तजवीज करून मंगळवारी बिल अदा केले. मात्र त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना डास आणि असह्य उकाड्यात संपूर्ण रात्र काढावी लागली.