‘त्या’ कवी व कुलगुरुंवर कठोर कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 10:12 PM2018-10-02T22:12:36+5:302018-10-02T22:13:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात आदिवासी महिलांविषयी अश्लिल मजकुराचा उल्लेख करणाऱ्या ‘त्या’ कवीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मुंबई विद्यापिठातील अभासक्रमात कवी दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या पुस्तकातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेत मुलनिवासी समाजाच्या मुलींविषयी अश्लिल व आक्षेपार्र्ह शब्दप्रयोग करून एक वाईट मानसिकता असलेल्या लेखकाच्या कवितेला मुंबई विद्यापीठाने मान्यता दिली. मुलींविषयी व स्त्रियांविषयी वाईट विचार ठेवणाऱ्या आणि विशिष्ट समाजाच्या मुलींवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या संबंधित कवी दिनकर मनवर, कुलगुरू तसेच कुलसचिव यांच्यावर विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी मोना घरत, रोशनी गेडाम, पंकज सिडाम, सुरज निमसरकार, आकाश गेडाम, कंटू कोटनाके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
भद्रावतीत तहसीलदारांना निवेदन
भद्रावती : मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात आदिवासी मुलींची मानहाणी करणारे वर्णन केले आहे. त्यामुळे कवी दिनकर मनवर, कुलगुरु, कुलसचिवांवर कारवाई करावी, अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा गोंडी धर्मीय आदीवासी एकता संघटनेतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद गेडाम, युवा आदिवासी नेते रमेश मेश्राम, गोलु गेडाम, माजी पं.स. सदस्य सुधाकर आत्राम, नरेश गेलाम, महादेव सिडाम, विनोद शेडमाके, निलेश गेडाम, दुशाल सिडाम, प्रमोद नागोसे, दिलीप मडावी, नगरसेविका अनिता मुडे (गेडाम), माला गेडाम, भाग्यश्री गेडाम, रत्ना सिडाम, पोर्णिमा गेडाम आदी उपस्थित होते.