‘त्या’ पदांमुळे कमी होऊ शकतो आरोग्य यंत्रणेवरील ताण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:28+5:302021-04-28T04:30:28+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. या संसर्गाचा आलेख अजूनही कमी झाला नाही. दररोज दीड हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह आढळत आहेत. ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. या संसर्गाचा आलेख अजूनही कमी झाला नाही. दररोज दीड हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामध्ये लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असली, तर गंभीर रुग्णांच्या दुरुस्ती दरात अद्याप वाढ झाली नाही. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयात बेड्स मिळविण्यासाठी रुग्णांच्या कुटुंबीयांना धावाधाव करावा लागत आहे. कोरोना रुग्णांसाठी तातडीने आक्सिजनयुक्त बेड्स व व्हेंटिलेटरर्स उपलब्ध करून देण्याची आरोग्य यंत्रणेची क्षमता संपली. त्यामुळे या सर्व सुविधांमध्ये नव्याने वाढ करण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे. तातडीच्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यासोबतच प्रशिक्षित मनुष्यबळाची नियुक्ती करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. सध्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून कोविड १९ विशेष कंत्राटी पदभरतीला मान्यता दिली. परिणामी, २२ एप्रिल, २०२१ रोजी १०३ कंत्राटी पात्र उमेदवारांची डाटा एन्ट्री प्रक्रिया पार पडली. त्याच दिवशी पात्र उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आली. मात्र, कोरोना संसर्गाचा ग्राप वाढत असूनही १०३ पैकी ८१ कंत्राटी पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्र देण्यात आले नाही.
२२ पदांसाठी एकही अर्ज नाही
कोरोचा उद्रेकाची स्थिती हाताळण्यासाठी एमडी अथवा डीएमडी मेडिसिन शैक्षणिक अर्हता असणाऱ्या फिजिशियन पदासाठी ११ आणि एमडी (अॅन्सेस) पदासाठी ११ अशा एकूण २२ जागांसाठी एकाही उमेदवाराने अर्ज सादर केला नाही. कोरोना संकट काळात ही पदे अत्यंत महत्त्वाची मानली जातात.
१८ स्टॉफ नर्स पदासाठी २१८ अर्ज
१८ स्टॉफ नर्स पदासाठी २१८ उमेदवारांनी अर्ज सादर केला. त्यापैकी जीएनए व बीएस्सी नर्सिंग पदवीधारक असलेल्या १३ जण पात्र ठरले. उर्वरित पाच जागा एएनएम प्रमाणधारकांमधून भरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, २०५ एएनएम प्रमाणधारकांनी या पदासाठी अर्ज केला होता.
भरण्यात येणारी पदे
हॉस्पिटल मॅनेजर १५
मेडिकल ऑफिसर ३४
स्टॉफ नर्स १३
लॅब टेक्निशियन ०९
स्टोअर ऑफिसर १५